रोटरी क्लब एनआयबीएम च्या अध्यक्षपदी नितीन करंदीकर
पुणे (दि.१२) रोटरी क्लब एनआयबीएम च्या अध्यक्षपदी नितीन करंदीकर यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष अजित वाळिंबे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. सेक्रेटरीपदी पद्मश्री उपळे यांची निवड करण्यात आली. मावळत्या सचिव डॉ.पल्लवी शहा यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. पुणे क्लब येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल शीतल शहा, रोटरी पदाधिकारी, सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचीत अध्यक्ष नितीन करंदीकर यांनी आगामी काळात सैन्यदलासाठी अॅम्ब्युलन्स, ग्रामीण भागात पाणीटाकी, तरुणांसाठी विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.
छायाचित्र : नितीन करंदीकर.