रुई रुग्णालयात जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने
सुंदर माझा दवाखाना या उपक्रमाचा शुभारंभ..!
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने
सुंदर माझा दवाखाना या उपक्रमाचा शुभारंभ माननीय श्री जितेंद्र गुजर
सन्माननीय सदस्य, रुग्ण कल्याण समिती, ग्रामीण रुग्णालय, रुई यांचे शुभहस्ते व रुग्णालय अधिकारी डॉ. दराडे, डॉ.पटेल मॅडम, डॉ. देवकाते मॅडम यांचे प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रूई रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुनील दराडे यांनी बोलताना म्हटले की
‘आरोग्याविषयीच्या बऱ्याच बाबींकडे विद्यार्थी दशेपासून लक्ष द्यायला हवे. उदा. स्वतःच्या शरीराची स्वच्छता, स्वच्छ अन्नपाण्याचे सेवन, व्यायाम-खेळ मनोरंजनाचे महत्त्व, नीट चालणे-बसणे उभे राहणे, वाहतुकीचे नियम, पोहण्याचे तंत्र, व्यसनांपासून दूर राहणे; योग ध्यान प्रार्थनांनी मन सच्छील खंबीर निग्रही बनविणे, प्रथमोपचारांची माहिती करून घेणे, आजार अंगावर न काढणे व वेळीच निदान करून घेणे; अपायकारक प्राणी- कीटकांपासून संरक्षण; वीज-आगीपासून अपघातांपासून संरक्षण इ. आरोग्यवर्धनाच्या चांगल्या सवयी लागल्यासच सशक्त, सुदृढ, बलशाली भारत निर्माण होईल. यासाठी आरोग्य शिक्षण व शिक्षकांचीही नितांत गरज आहे”. सर्व उपस्थित त्यांना आरोग्यदायी शुभेच्छा जागतिक आरोग्य दिनानिमित्त देण्यात आले या कार्यक्रमासाठी रुई रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारीवर्ग रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला