संध्याकाळी ०७ पासून भैरवनाथ जोगेश्वरी हळदीचा कार्यक्रम रुई यात्रेला सुरुवात…!
रुई बारामती : येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांकडून बुधवार पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी सायंकाळी ८ वाजता देवाच्या हळदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. गुरुवारी १३ला सकाळी ८ वा. काठी, पालखी मिरवणूक, दंडवत, नैवेद्य व घोटा
कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता देवाचा लग्नसोहळा पार पडेल. त्यानंतर रात्री छबिना काठी, पालखी मिरवणूक होईल. ९ वाजता लावण्यांचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी १४ ला सकाळी १० ते दुपारी ३ लोकनाट्याचा कार्यक्रम व सायंकाळी निकाली कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव चौधर, विश्वस्त मच्छिद्र चौधर, पांडुरंग चौधर, खजिनदार साळुंके यांनी केले आहे.