
रुई (बाबीरनगरी) येथे सरपंच आकाश कांबळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा….
इंदापूर (प्रतिनिधी): रुई (बाबीरनगरी) गावाचे सरपंच व भाजप पुणे जिल्हामहामंत्री आकाश नंदा विलास कांबळे यांचा अभिष्टचिंतन आणि नागरी सत्कार सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. विविध कार्यक्रमांनी सजलेल्या या सोहळ्यास ग्रामस्थांसह मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. सकाळी श्री क्षेत्र बाबीर देवस्थानात महापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
बाजारतळावर रोगनिदान शिबिर घेण्यात आले. दुपारी आकाश कांबळे यांच्या नावाने उभारलेल्या शॉपिंग सेंटरचे उद्घाटन झाले.
संध्याकाळी अभिष्टचिंतन व नागरी सत्कार सोहळा पार पडला. रात्री खुल्या डान्स स्पर्धेने उत्सवाची सांगता झाली.
मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास वासुदेव (नाना) काळे, बाळासाहेब (तात्या) गावडे, प्रविण (भैय्या) माने, माऊली चौरे, गजानन वाकसे यांच्यासह भाजप पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्याचा गौरव मान्यवरांनी आपल्या भाषणात आठवडे बाजाराचे पुनरुज्जीवन, आरोग्य शिबिरांचे आयोजन, विकास निधीचा पारदर्शक वापर आणि ग्रामपंचायतीमार्फत होत असलेल्या विकासकामांचा उल्लेख करून सरपंच आकाश कांबळे यांच्या कार्याचा गौरव केला.
हा सोहळा नवनिर्माण प्रतिष्ठान, ग्रामपंचायत रुई व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.