राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई : बनावट गोवा मद्याचे ३०५ बॉक्स आणि वाहनासह ५२.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
57

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई : बनावट गोवा मद्याचे ३०५ बॉक्स आणि वाहनासह ५२.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी (दि.१५ मे २०२५) — राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे जी विभागाने केलेल्या धडक कारवाईत बनावट गोवा बनावटीच्या मद्याचा साठा पकडण्यात आला आहे. या कारवाईत एकूण ३०५ बॉक्स विदेशी मद्य आणि सहा चाकी वाहन (MH-15-JC-1388) असा एकूण ५२,२८,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई मा.आयुक्त डॉ. राजेश देशमुख, मा. सहआयुक्त श्री. पी.पी. सुर्वे, मा. विभागीय उप-आयुक्त श्री. सागर धोमकर, मा. अधीक्षक श्री. चरणसिंग राजपूत, व मा. उप-अधीक्षक श्री. सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पिंपरीतील जुना पुणे-मुंबई महामार्ग, बल्लभनगर बसस्थानकाच्या समोर निरीक्षकांनी वाहनांची तपासणी करताना EICHER कंपनीचे सहा चाकी वाहन थांबवून तपासले. या वाहनात गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली Royal Blue व्हिस्कीच्या १८० मि.ली.च्या ३०५ बॉक्सेस आढळून आले.

विदेशी मद्याची महाराष्ट्रात विक्रीसाठी किंमत : २४,८८,८००/- रुपये
वाहनाची अंदाजे किंमत : २७,४०,०००/- रुपये
एकूण जप्त मुद्देमाल : ५२,२८,८००/- रुपये

या प्रकरणात विशाल सुफलाल वराडे (वय ३१, रा. भुसावळ, जि. जळगाव) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई निरीक्षक श्री. संजय के. कोलो, दुय्यम निरीक्षक श्री. अभय औटे, श्री. बी.जी. रेडेकर, श्री. गणेश पठारे, तसेच कर्मचारी प्रमोद पालवे, विजय चंदुरे, अमोल कांबळे आणि महिला जवान प्रिया चंदनशिवे यांच्या प्रयत्नांतून पार पडली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री. अभय औटे करत आहेत.

राज्यात परराज्यातून आलेल्या मद्याच्या विक्रीमुळे शासनाचे महसूल नुकसान होत असल्याने अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीवर विभाग सातत्याने कारवाई करत असून, पुढेही ही मोहीम अधिक तीव्रतेने सुरूच राहणार असल्याची माहिती मा. अधीक्षक श्री. चरणसिंग राजपूत यांनी दिली.

अवैध मद्य व्यवहारासंबंधी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे कार्यालयाच्या ०२०-२६१२७३२१, टोल फ्री १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सॲप ८४२२००११३३ या क्रमांकांवर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here