राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन प्रचार प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी क्रीडा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य…!

0
31


राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन प्रचार प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी क्रीडा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्या अनुषंगाने नगर विकास विभाग व मा. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, बेलापूर यांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार जिल्हास्तरावर नोव्हेंबर महिन्यात अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम सुनियोजित व यशस्वीरित्या आयोजन करणेचे निर्देश असलेने महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरण अंतर्गत पुणे जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ९ ते ११ जानेवारी २०२४ दरम्यान करण्यात आले होते. सदर जिल्हा स्तरीय कार्यक्रमाचे प्रथम आयोजन करण्याचा बहुमान बारामती नगर परिषदेस मिळाला. या क्रिडा स्पर्धेमध्ये क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल,रस्सीोखेच, स्वीबमिंग, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धीबळ इ. क्रिडा प्रकार व सांस्कृ्तिक कार्यक्रम यांचा समावेश होता.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन 9.01.2025 रोजी सकाळी 9.00 वाजता बारामती नगरपरिषदेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील ‌ व जिल्हा प्रशासन अधिकारी श्री व्यंकटेश दुर्वास, अध्यक्ष व जिल्हपयातील 17 नगर परिषद, नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी –बारामती नगर परिषद मुख्याधिकारी श्री. महेश रोकडे, लोणावळा मुख्याकधिकारी श्री. अशोक साबळे, दौंड मुख्याधिकारी विजय कावळे, तळेगाव मुख्या धिकारी विजयकुमार सरनाईक, चाकण मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, सासवड मुख्याधिकारी कैलास चव्हाण, जेजुरी मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, इंदापुर मुख्याधिकारी रमेश ढगे, शिरूर मुख्याधिकारी प्रितम पाटील, आळंदी मुख्याधिकारी कैलास केंद्रे, जुन्नर मुख्याधिकारी संदीप भोळे, भोर मुख्याधिकारी गजानन शिंदे, राजगुरूनगर मुख्यााधिकारी अजिंक्य रणदिवे, वडगाव मुख्याधिकारी प्रविण निकम, माळेगाव मुख्याधिकारी बालाजी लोंढे, देहू मुख्याधिकारी श्रीम. निवेदिता घार्गे, मंचर मुख्यााधिकारी गोविंद जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संपूर्ण पुणे जिल्हा मधून एकूण 17 नगरपरिषद व नगरपंचायती, तसेच नगर पालिका शाखा, जिल्हांधिकारी कार्यालय, पुणे व नगर परिषद प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व सहभागी खेळाडू, दौंड CRPF यांचे बँड पथक व टी. सी. कॉलेज यांचे NCC चे विदयार्थी पथक यांचे एकत्रित संचलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बारामती शहरात आलेल्या सर्व संघांचे स्वागत बारामती नगर परिषदेचे मा.मुख्याधिकारी श्री महेश रोकडे यांनी केले. उपस्थित सर्व खेळाडूंना सांघिक भावनेने खेळण्याचे आवाहन करुन शुभेच्छा दिल्या.
सदरच्या स्पर्धेत विविध प्रकारच्याु खेळामध्ये. 1079 अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये 792 पुरुष व 287 महिला खेळाडूंचा समावेश होता. सर्व स्पर्धा या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, जिल्हा क्रिडा संकुल, टी.सी.कॉलेज ग्राऊंड, मिशन हायस्कू‍ल ग्राऊंड तसेच सां‍स्कृतिक कार्यक्रम व स्प र्धा या कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे घेण्यात आल्या . सर्व स्पर्धकांची दिनांक 08 ते 11 जानेवारी या कालावधीमध्ये राहण्याची व भोजनाची व्यवस्‍था करणेत आली होती.
कविवर्य मोरोपंत नाट्यगृह या ठिकाणी दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी मा. अजित दादा पवार सो., उपमुख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य् यांच्या हस्ते दि. 9 ते 11 जानेवारी रोजी पार पडलेल्या विविध क्रिडा स्पर्धामध्ये प्रथम, द्वि‍तीय, व तृतीय क्रमांक मिळविलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना बक्षीसांचे वितरण करणेत आले. यावेळी श्री. दत्तात्रय लांघी, मा. उपायुक्त नगर परिषद प्रशासन शाखा विभागीय आयुक्त कार्यालय पुणे व श्री. व्यंकटेश दुर्वास, सह. आयुक्त, नगर पालिका शाखा, जिल्हााधीकारी कार्यालय , पुणे हे व जिल्ह्यातील नगर परिषदांचे मुख्यााधिकारी उपस्थित होते.
सर्व नगर परिषदेच्या् अधिकारी व कर्मचारी यांनी क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश संपादित केले असून यामध्ये
सांघिक प्रकारात :- क्रिकेटमध्ये बारामती नगर परिषद प्रथम क्रमांक,
रस्सी्खेच(पुरूष) बारामती नगर परिषद प्रथम क्रमांक
रस्सी्खेच(महिला) चाकण नगर परिषद व RDMA संघ प्रथम क्रमांक,
व्हॉलीबॉल प्रथम क्रमांक शिरुर नगर परिषद कबड्डी प्रथम क्रमांक इंदापूर नगर परिषद 4100 मी रिले(महिला) यामध्ये बारामती नगर परिषद प्रथम क्रमांक 4100 रिले(पुरूष) प्रथम क्रमांक शिरूर नगर परिषद
4400 मी रिले (पुरूष) प्रथम क्रमांक देहू नगर परिषद 4400 मी रिले (महिला) प्रथम क्रमांक आळंदी नगर परिषद
वैयक्तिक स्पर्धा :- प्रकारात
1 बॅडमिंटन एकेरी पुरूष प्रथम क्रमांक सासवड नगर परिषद,
एकेरी महिला प्रथम क्रमांक देहु नगर परिषद
2 बॅडमिंटन दुहेरी पुरूष प्रथम क्रमांक लोणावळा नगर परिषद,
दुहेरी महिला प्रथम क्रमांक सासवड नगर परिषद
3 टेबल टेनिस एकेरी पुरूष प्रथम क्रमांक न. प प्रशासन शाखा जिल्हारधिकारी कार्यालय, पुणे
एकेरी महिला प्रथम क्रमांक आळंदी नगर परिषद
4 टेबल टेनिस दुहेरी पुरूष प्रथम क्रमांक बारामती नगर परिषद
दुहेरी महिला प्रथम क्रमांक जुन्निर नगर परिषद
5 बुद्धीबळ पुरूष प्रथम क्रमांक बारामती नगर परिषद
महिला प्रथम क्रमांक दौंड नगर परिषद
6 कॅरम पुरूष प्रथम क्रमांक बारामती नगर परिषद
महिला प्रथम क्रमांक दौंड नगर परिषद
7 100 मी. धावणे पुरूष प्रथम क्रमांक शिरूर नगर परिषद
महिला प्रथम क्रमांक लोणावळा नगर परिषद

  1. 200 मी. धावणे पुरूष प्रथम क्रमांक लोणावळा नगर परिषद
    महिला प्रथम क्रमांक आळंदी नगर परिषद
  2. 400 मी. धावणे पुरूष प्रथम क्रमांक सासवड नगर परिषद
    महिला प्रथम क्रमांक RDMA संघ
    10.3 किमी चालणे पुरूष प्रथम क्रमांक जुन्नंर नगर परिषद
    महिला प्रथम क्रमांक देहू नगर परिषद
    11.गोळाफेक पुरूष प्रथम क्रमांक शिरूर नगर परिषद
    महिला प्रथम क्रमांक बारामती नगर परिषद
    12.थाळीफेक पुरूष प्रथम क्रमांक शिरूर नगर परिषद
    महिला प्रथम क्रमांक बारामती नगर परिषद
    13 लांब उडी पुरूष प्रथम क्रमांक शिरूर नगर परिषद
    महिला प्रथम क्रमांक बारामती नगर परिषद संघ
    14.उंच उडी पुरूष प्रथम क्रमांक शिरूर नगर परिषद
    महिला प्रथम क्रमांक बारामती नगर परिषद
    15.फ्रि स्टा इल पोहणे प्रथम क्रमांक बारामती नगर परिषद

सांस्कृ तिक कार्यक्रमामध्ये :- प्रथम क्रमांक प्राप्त नगर परिषदा
गायन सोलो सॉंग- दौंड नगर परिषद समुह गायन – तळेगाव नगर परिषद वैयक्तिक नृत्य– आळंदी नगर परिषद समुह नृत्य – जुन्नर नगर परिषद वेशभुषा- दौंड नगर परिषद नाटिका- बारामती नगर परिषद प्रहसन- शिरूर नगर परिषद रांगोळी – बारामती नगर परिषद
कविता वाचन- जुन्न र नगर परिषद
पाककला- देहू नगर परिषद बक्षीस वितरण पार पडलेनंतर मा. उपायुक्तब व मा. सह आयुक्त यांनी बारामती नगर परिषदेचे मा. मुख्याधिकारी महेशजी रोकडे, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पुणे जिल्हा क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुव्यवस्थित नियोजन केलयामुळे सर्वांचे कौतुक केले व कार्यक्रमाचा समारोप केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here