राजकिय नेत्याना गाव बंदी हि मराठा समाजाच्या परिवर्तनाची नांदीच म्हणावी लागेल आरक्षणावर ठाम हे मराठा समाजाच्या प्रगतीचे विकासाचे मंथनच सुरु झाले.
कुऱ्हाड बंदीने वनांचे संवर्धन झाले नस बंदीने कुटुंब नियोजन झाले नशाबंदीने नशेवर आळा बसला तसाच परिणाम राजकीय नेत्यांच्या
गावबंदीने घडुन येईल व आंदोलन यशस्वी होईल
मराठा समाजाची आजची दारुण परिस्थिती का,कशी निर्माण झाली याचे संशोधन केले तर गावागावात शिरलेल राजकारण,समाजातील तरुणाई राजकिय नेत्यामुळे कामाला लागली नाही.तर कामातुन गेली होती.
ग्रामपंचायतीच्या राजकारणापासुन ते लोकसभेच्या राजकारणा पर्यंतचे राजकारण हे तरुणाईच्या अंगात संचारले होते.आपल्या नेत्यांचा उदोउदो करण्यात तरुणाची तरुणाई केव्हा संपली बाबाच्या फोटोचा आदरापेक्षा राजकिय नेत्याचा फोटो आदरणिय वाटतो. बापाला दुरावल्यामुळे काय अवस्था झालीय हे अनेकांना समजलेच नाही
गावात राजकिय पक्षाच्या गटातटाचा प्रभाव इतका होता की,बहुसंख्य गाव हि आपले गावगाड्याचे संबंध विसरुन राजकारणाचा गाडा ओढीत होते. या राजकारणाची उब असल्यामुळे दारिद्र्याचे चटके बसत आहेत याची जाणिव होत नव्हती. ती आता झाली पाहिजे.
हे चटके इतके भीषण होते की, केवळ आपल्या नेत्याचा आदेश शिरसावंद्य मानून ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढण्यापायी काहीनी आपल्या कसदार जमिनी विकल्या.या तरुणांची नाडी धुर्त राजकारण्यांना सापडल्यामुळे धनदांडग्याच्या घशात जमिन घालण्यासाठी गावोगावी एजंट तयार झाले.दलाली आमिष दाखवले गेले
शेतकऱ्याच्या कसदार जमिनी कसायाच्या दारात गुरे नेऊन सोडावी अशा कसाब नितीने जमिनी विकल्या गेल्या विकासाच गाजर दाखवल.परिणामी ज्या शेताचा मालक शेतकरी होता.तेथे तो धनदांडग्याचा चाकर म्हणुन राबुन लागला.मुळशी पॅटर्न या चित्रपटाने हे वास्तव समोर आणले आहे.
राजकारणाच्या गटातटाने गावाचं गावपण केवळ संपलेच नाही तर गोकुळा सारख्या नांदत असणारे कुटुंब हे विविध राजकिय पक्षामुळे भिन्न वैचाराने एक दुसऱ्याशी एकाच छताखाली राजकिय छतच महान समजुन वागु लागले.एकाच घरात अनेक पक्षीय विचारांचे असल्यामुळे कौटुंबिक संवाद राहिले नाही.
छोट्या छोट्या निवडणूका लढण्यातुन सख्ये भाऊ पक्के वैरी होऊ लागले.नेत्यावरील व्यक्तीपुजक अंधश्रध्देतुन खऱ्या अर्थाने गाव उध्वस्त होऊ लागली जातीयतेचा वापर राजकारणासाठी होऊ लागला.परीणामी मागास जातीचे लोक अन्याया विरूध्द संघर्ष करु लागले किंवा गाव सोडुन जाऊ लागले.त्यामुळे शेती धंद्याचे नुकसान होऊ लागले.
राजकारणाने झपाटलेल्याना हे समजेना शेती हि एका मालकाची असली तरी ती पिकवताना जातधर्म पंथ विसरून ती सामुदायिकपणे राबल्या नंतरच ती पिकत असते. नांगरणी,पेरणी,कोळपणी कापणी यासाठी अनेक हात राबत असतात.तेच अनेक गटातटाच्या राजकारणाने दुरावले.
तरुणाईला जुन्या जाणत्याचे विचार ठावुक झालेच नाही.जुने जाणते म्हणायचे “राजा राज्य कमवी दुबळ झोप गमवी” तसे राजकर्ते सत्ताधारी व विरोधक एक विचाराने एक कप चहा किंवा अन्य पवित्र जल दोघांत मिळुन पीत होते कोट्यावधी कमवत होते.गावाकडचा तरूण मात्र केवळ झोपच नाही तर सारंच काही गमावुन बसत होता.
ह्या सर्व राजकारणातुन विनाशाकडे जाणाऱ्या परिस्थितीचे आता वैचारीक मंथन झाले पाहिजे.उशीरा का होईना सुचलेल्या शहाणपणातुन आता तरुणाईने जागे झाले पाहिजे.
धर्माच्या व राजकारणाच्या ठेकेदारानी आजवर झुलवत ठेवले ते राजकारण आता वेशी बाहेर ठेवले पाहिजे.व आजवर वेशी बाहेर असणारे गावात घेतले पाहिजे.सर्व हात एकोप्याने राबले तर शेती धंद्याला लागलेली राजकारणाची किड दुर होऊन उत्तम पीक येऊन शेती समृध्द होईल.
शेतकरी हा दारिद्र्याने बळी न जाता तो पुर्वीचा बळीराजा होईल.
तरुणाने आता राजकीय संन्यास घेऊन राजकारण गेलं चुलीत म्हटले पाहिजे राजकारण चुलीत गेल तरच घरात चुली पेटतील आजवर राजकारण गावागावात शिजत असल्यामुळे एकोप्याने बसुन घराघरात खाणार अन्न तरुणाई न खाता राजकिय नेत्यांच्या आशिर्वादाने धाब्यावर पोटाची भुक भागत होती त्यामुळे त्यांची चुल पेटत नव्हती परिणामी ज्याची चुल बंद त्यांची अक्कल बंद अशी परिस्थिती झाली होती.
आता आरक्षणाच्या आंदोलनात राजकारण काय असते.राजकिय नेते कसे वापरून घेतात वेळ आली तर कशी पाठ फिरवतात.एका बोटांची थुंकी दुसऱ्या बोटावर कशी नेतात हे कळुन आले असेल तर राजकिय नेत्याचे चाकर होण्यापेक्षा स्वतच्या काळ्या आईला माय पंढरीला जाणा
गितेतल्या यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् या श्लोका प्रमाणे सन्माननिय अमोल जरांगेच्या रुपाने क्रांतीची ज्योत पेटली गावगाड्यात क्रांती होऊ द्या.गावाचे रक्षण हा देखील आरक्षणाचा गाभाच आहे
राजकिय जोडे वेशी बाहेर ठेवा.राजकारणी गावात शिरु पाहत असला तर त्याच जोड्याने हाणा!क्रांतीचे विकासाचे मुलतंत्र जाणुन घ्या विस्थापितांची चळवळ जेव्हा प्रस्थापित नेत्याच्या हातात असते तेव्हा चळवळीचा इस्कोट सत्यानाश होतो.तेच आजवर दुबळे झालेल्या सर्वच समाजाच्या बाबतीत घडत आले आता विस्थापितातुन तयार झालेले अमोल जरांगे हे नेतृत्व लाभल्यामुळे नवी पहाट दिसु लागली.
प्रस्थापिताची राजवट आता बदलुन आजवर पिचलेल्या दबलेल्या तरुणाईतुन नवा महाराष्ट्र घडवु.मराठा यावरून महाराष्ट्र संबोधले जाते.हा व्यापक विचार महाराष्ट्रात रुजवु
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता