0
215

राजं तुम्ही परत याल का?

राजं
देऊन गेलात तुम्ही
रयतेचं राज्य आम्हास
तिथ पर्यंत बरं चाललं होतं.
पण ,आज
आमच्याच घरावरची छपरं
उडून जात आहेत….
ओढून घेत आहेत
तुटक्या ताटलीतली
आमची कष्टाची
कोरभर भाकर
स्वतःचं पोट भरण्यासाठी
अन्…..आम्ही
काहीच करू शकत नाही
माथ्यावरचं कर्जाचं ओझं *
अजूनही चढतच आहे. ..
झाडाच्या फांदीला फळं कमी
पण ,
गळफासानं लटकलेली धडं
पाहवत नाहीत हल्ली..
राजं
ढासळतोय तो माणुसकीचा
एकेक चिरा
तुमच्या नंतर
लेकीसुनांची ओटी भरून
बोळवण करणं ..
कुणालाच कसं जमलं नाही?
धर्म जातीच्या नावाखाली
चौकाचौकात
पेटून दिल्या जातात दंगली
चिरडली जातेय
मानवता
वेगवेगळ्या झेंड्याखाली
राजं ..आता
एकच मागणं.
तुम्ही परत याल का ?
तुम्ही परत याल का?

श्रीमंतयोगी छ.शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन.💐🙏🏻💐

©️®️🖋️ अंजली राठोड श्रीवास्तव.करमाळा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here