“मुलींचा अभिमान असलेल्या पित्याची अंतिम इच्छा पूर्ण,
रसिका दिलीप पंडित यांनी वडिलांना दिला अग्नी”
बारामती: २३ डिसेंबर २०२४ – कष्टाने आयुष्य उभारून मायेच्या सावलीने अनेकांना आधार देणारे कै. दिलीप वसंत पंडित यांचे मावळत्या सूर्याबरोबर निधन झाले. त्यांच्या जाण्याने समाजातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपले आहे.
कै. दिलीप पंडित हे आपल्या प्रगल्भ विचारांनी आणि समाजासाठी केलेल्या कार्यामुळे प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या अंतिम इच्छेनुसार सर्व अंत्यविधी त्यांच्या मुलींनी पार पाडले. विशेषतः त्यांच्या धाकट्या कन्या कु. रसिका दिलीप पंडित यांनी वडिलांना अग्नी देऊन एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. समाजात प्रचलित असलेल्या परंपरांना आव्हान देत त्यांनी महिलांचे योगदान दाखवून दिले.
या प्रसंगाने समाजात एक नवीन विचार निर्माण केला आहे. “मुलींचा अभिमान असलेल्या पित्याने अखेरच्या क्षणापर्यंत स्त्रीशक्तीवर विश्वास ठेवला,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या जाण्याने पंडित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी त्यांचे विचार आणि आदर्श समाजासाठी प्रेरणा ठरतील. भावनगरीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली