माळेगाव येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
बारामती, दि. 6: अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळेगाव व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाच्यावतीने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजित करण्यात आले.
यावेळी माळेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे, आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संपदा हिंगोले, अधिष्ठाता डॉ. अनिल काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक सागर शिंदे, गटनिदेशक संतोष सपकळ, सचिन देवकते, निवास काळे आदी उपस्थित होते.
डॉ हिंगोले यांनी प्रशिक्षणार्थींना रक्तदानाचे महत्व नमूद करुन तरुणांनी तीन महिन्याला एकदा रक्तदान करण्याचे आवाहन केले. रक्तदान करतांना रक्तदात्यांच्या मनामध्ये उद्भवणाऱ्या विविध शंकाचे त्यांनी निरसन केले.
श्री. लोखंडे यांनी शिबिरास भेट देवून रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराचे कौतुक केले. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये नागरिकांनी नियमितपणे तपासणी करावी, असेही श्री. लोखंडे म्हणाले.
या रक्तदान शिबिरात प्रशिक्षणार्थ्यांनी एकूण 68 युनिट रक्तदान केले. तसेच यावेळी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाच्यावतीने आयोजित ‘देश का प्रकृती परीक्षण’ या आरोग्य तपासणीशिबाराअंतर्गत प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली.