माळेगाव बुद्रुक येथे ‘फौजदारी कायदे व सायबर गुन्हेगारी’ विषयी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

0
13

माळेगाव बुद्रुक येथे ‘फौजदारी कायदे व सायबर गुन्हेगारी’ विषयी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

बारामती, दि. १: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळेगाव बुद्रुक येथे ‘फौजदारी कायदे व सायबर गुन्हेगारी’ विषयी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, गटनिदेशक एस. एम. सपकळ, शिल्प निदेशक एस. टी. पवार, तसेच शिल्प निदेशक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

श्री. लोखंडे म्हणाले, आजचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे, त्यामुळे समाज माध्यमे ही काळजीपूर्वक आणि कामापुरतेच वापरली गेली पाहिजेत. मोबाईलवर येणाऱ्या संदेशाची खात्री करावी. आर्थिक आमिषाला बळी न पडण्याबाबत काळजी घ्यावी.

समाजातील अपप्रवृत्ती, गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्याकरीता एकमेकांशी संवाद साधाला पाहिजे, चांगल्या, वाईटातील फरक समजावून घेतला पाहिजे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी शिक्षक व इतर विद्यार्थ्यासोबत सकारात्मक विषयावर चर्चा करावी, असे मार्गदर्शन श्री. लोखंडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here