माजी विद्यार्थ्यांचा आक्रोश…केज ची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा – प्रशासनाच्या उदासीनतेवर विद्यार्थ्यांचा पोट तिडका..! काहीही असो… शाळा सुरू झालीच पाहिजे…!!

0
5

माजी विद्यार्थ्यांचा आक्रोश…! काहीही असो… शाळा सुरू झालीच पाहिजे…!!

केजची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा – प्रशासनाच्या उदासीनतेवर विद्यार्थ्यांचा पोट तिडका…

केज तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पटसंख्या घटली म्हणून बंद ठेवणे म्हणजे शिक्षणावर घाला आहे. पक्की इमारत, प्रशस्त मैदान, वर्षानुवर्षांची परंपरा असलेली शाळा आज कुलूपबंद—आणि प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत! त्या गरिब होतकरू व विद्यार्थ्यांचे भविष्य मात्र अंधारातच जे फी भरू शकत नाहीत अशा शाळा बंद पडल्या तर मग कोठे जायचे त्यांनी

याच शाळेतून घडलेले अधिकारी, सैनिक, खेळाडू आज देशसेवेत आहेत; पण त्याच शाळेच्या दारावर आज कुलूप! गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी नाकारली जात आहे. सोशल मीडियावर संताप उसळतोय, माजी विद्यार्थी एकवटत आहेत, व्हॉट्सअ‍ॅपवर गट तयार झालेत—“शाळा सुरू करा” ही एकच मागणी!

प्रश्न थेट आहेत: उदासिनता असणाऱ्या आळशी प्रशासनाला
पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न कुठे थांबले?

इमारत-फर्निचर-शैक्षणिक साहित्य असूनही शाळा का बंद असा प्रश्न विचारणा होत आहे..!

विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थी ठाम आहेत—दुरुस्ती, फर्निचर, मोफत साहित्य देऊन तात्काळ वर्ग सुरू करा. अशी मागणी ही संबंधीत प्रशासनाकडे होत जूनपासून पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करून शाळेला पुन्हा उभारी द्या. केजला मोठ्या प्रमाणावर
२६ जानेवारीला माजी विद्यार्थ्या उपस्थित राहणार तशी चळवळ सुरू झाली आहे.

एकच घोषणा:
काहीही असो… शाळा सुरू झालीच पाहिजे!
प्रशासनाने आता निर्णय घ्यावा— लागेल!

मित्र
संपादक
भावनगरी ..
हल्ली मु.पो बारामती
20 वर्षापासून पत्रकारिता…
सन १९८९-९४

५ व

Previous articleश्री गुरु तेग बहादुर – ‘हिंद दी चादर’
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here