महिला उन्नती संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा श्रीदेवी पाटील यांचा संसदरत्न खा.फौजिया खान कृत गौरव !
परभणी – महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सतत कार्यरत असणाऱ्या महिला उन्नती संस्था भारत च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा श्रीदेवी पाटील यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन, अल्पावधीत केलेल्या सदस्य संख्येत वाढ व महिलांना मार्गदर्शन आणि हिताचे कार्यामुळे मिळालेल्या पुरस्काराबद्दल येथील जनसंहयोग सेवाभावी संस्थेतर्फे एका भव्य कार्यक्रमात संसदरत्न खा.फौजिया खान यांच्या हस्ते सत्कार करून श्रीदेवी पाटील यांना गौरविण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ,जनसहयोग सेवाभावी संस्थेतर्फे दिनांक 17 जून 2023 रोजी शादाब फंक्शन हॉल, दर्गा रोड ,परभणी येथे सुप्रसिद्ध विधीज्ञ ‘ परभणी भूषण ‘अशोक जी सोनी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात , श्रीदेवी पाटील यांनी केलेल्या,महिलांचे हिताचे कार्याबरोबरच इंडियन रिपोरटर्स इंटरनॅशनल नवी दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर राहून पत्रकारांच्या समस्या सोडविण्याचेही कार्य करत असतात ,त्यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन महिला उन्नती संस्थेतर्फे विशेष प्रशस्तीपत्र प्रदान केले आहे त्याबद्दल जनसेवक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महमूद खान व संयोजक मोहीम खान यांनी आयोजित केलेल्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात संसद रत्न मा. खा. फौजिया खान यांच्या हस्ते सन्मान करून श्रीदेवी पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे .
यावेळी परभणी मधील सामाजिक ,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रामधील ज्येष्ठ नेते गुलाम मोहम्मद मिठ्ठु ,ज्येष्ठ पत्रकार रमाकांत अण्णा कुलकर्णी , सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संगीता अवचार ,पो.नि.सचिन इंगेवाड ,प्रसिध्द उद्योजक मोहम्मद गौस झैन महिला संस्थेच्या जयश्रीताई टेहरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर तसेच गुणवंत विद्यार्थी ,उत्कृष्ट महिला बचत गटांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अरुण पडघन यांनी उत्कृष्ट केले कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवर नागरिक महिला बचत गटाच्या सदस्य व विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती.
जनसहयोग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महमूद खान, संयोजक मोईन खान ,महिला उन्नती संस्था भारतचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा इरा चे परभणी जिल्हा अध्यक्ष,मदन बापू कोल्हे ,परभणी पि.आर.ओ.देवानंद वाकळे ,हिंगोली जिल्हा अध्यक्ष उत्तम धायजे,गंगाखेड तालुका अध्यक्ष राजेश कांबळे, विठोबाचे कार्यकारी संपादक प्रवीण मोरे आदींनी श्रीदेवी पाटील यांचे अभिनंदन केले आहे.