महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जबाबदार पर्यटनाच्या संकल्पनामुळे पर्यटन जोरात…

0
475

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जबाबदार पर्यटनाच्या संकल्पनामुळे पर्यटन जोरात…

     संपुर्ण जगामध्ये कोरोना विषाणुचे थैमान सरू होते. त्याचा सवाधिक फटका हा पर्यटन आणि पर्यटनासाठी काम करणाऱ्या लोकांना झाला.  मात्र कोरानाचा प्रादुर्भाव कमी होताच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या उपाययोजनांमुळे आणि राबविलेल्या नवनवीन संकल्पनांमळे पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. महामंडळाच्या वार्षिक आढाव्यामध्ये महामंडळाच्या सर्वच विभागांनी अप्रतिम कामगिरी केली असल्याचे या बैठकीमध्ये दिसन असले आहें. 

महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक मा. श्रध्दा जोशी-शर्मा आणि महाव्यवस्थापक मा. चंद्रशेखर जयस्वाल यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी राबविलेल्या नवनवीन संकल्पना, कोरोना विरोधातील राबविलेल्या उपाययोजना, पर्यटकांना दिलेल्या सर्वोत्तम सुविधा यांमुळे महामंडळाच्या पर्यटक निवासांना पर्यटकांनी पुन्हापुन्हा भेट दिली आहे. 

मागिल वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यांनतर पर्यटक निवासांमध्ये वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या अभिनव संकल्पनांमुळे महामंडळाच्या पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ दिसुन आली आहे.

टाळेबंदीमुळे कंटाळलेल्या पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहीती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहीती वेबसाईट, फेसबुक आणि Whats app ग्रुप च्या माध्यमातुन देण्यात आल्याने आणि पर्यटनाची प्रसिध्दी विविध माध्यमातुन पर्यटकांपर्यंत पोहोचविल्यामुळे पर्यटनास नवा आयाम मिळाला आहे असुन खाशा पर्यटकांना पर्यटनाची ओढ निसर्गरम्य पर्यटनस्थळाकडे खेचुन ओढण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यशस्वी झाले आहे.
सध्या राज्यात मान्सुन सकिय झाला असुन सर्वत्र निसर्गानं हिरवी शाल पांघरली आहे.

त्यामुळे हिरव्यागार डोंगररांगा आणि निसर्गरम्य समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावत आहेत. निसर्गाचं मनमोहक रुप मनात साठविण्यासाठी, दऱ्या डोंगरावर भटकंती करण्यासाठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करुन घेण्यासाठी पर्यटक आसुसलेले आहेत.

हे सर्व पर्यटक पर्यटनाचा निखळ आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवांसांमध्ये येत आहेत. दमदार पावसामुळे निसर्गाने मनमोहक अशी हिरवाई वाढली आहे.

त्यामळे सुरू झालेले हिवाळी हंगामातील पर्यटन जोरदार होणार असल्याने पर्यटकांनी नियोजन सुरु केल्याचे दिसुन येत आहे.
आगामी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी च्या सुटटयांसाठी नोकरदार वर्ग आणि पर्यटन व्यावसायिक ही पर्यटनाचे नियोजन करीत आहेत.

त्यासाठी पर्यटन विकास महामंडळानेही जय्यत तयारी सुरु केली आहे. वर्षा पर्यटन आणि हिवाळी पर्यटन हंगामासाठी महामंडळाच्या पर्यटक निवासांचे जोरदार बुकिंग सुरु असल्याचे निदर्शनास येत असल्याने निसर्गरम्य असलेल्या पर्यटक निवासामध्ये गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक ही उत्सुक असल्याचे दिसुन येत आहे. महामंडळानेही हिवाळी पर्यटनासाठी जबाबदार पर्यटना बरोबरच नवनव्या संकल्पना राबविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. अशा पर्यटकांसाठी अनोख्या सवलती जाहीर केलेल्या आहेत.

जेष्ठ नागरिक, शासकिय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती देण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी – माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 15/20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना महामंडळानेही पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी “टुर पॅकेजची” सुरवात केली असल्याने पर्यटक मोठया प्रमाणावर आनंद व्यक्त करीत आहेत. सोयी सवलतींमुळे आणि वर्षा ऋृतुतील आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटकांमध्ये वर्षा पर्यटनासाठी उत्साह दिसुन येत आहे. त्यामुळे आगामी काळात वर्षा पर्यटनास बहर येणार आहे. त्यामुळे डिसेंबर, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक महामंडळाच्या पर्यटक निवासांना प्राधान्य देत भरघोस प्रतिसाद दिला आहे.
कोसळणारा पाऊस, आल्हाददायक कानात शिळ घालणारा वारा आणि दाट धुक्याच्या दुलईमध्ये चिंब भिजत निसर्गाचा आनंद घेण्याचे हे गुलाबी क्षण यादगार करण्यासाटी पर्यटकांची चढाओढ सुरु आहे. आपणही या अनोख्या वातावरणामध्ये वर्षा पर्यटनाचा धुक्याच्या आणि उबदार थंडीच्या साथीने आनंद घ्यावा, असे महामंडळाने आवाहन केले आहे.
एमटीडीसीच्या माननीय व्यवस्थापकीय संचालक श्रीमती. श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) ने एमटीडीसी रिसॉर्ट्सची आढावा बैठक घेतली.

या बैठकीला मुख्य कार्यालयांचे सर्व अधिकारी, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक, प्रादेशिक व्यवस्थापक आणि निवास व्यवस्थापक उपस्थित होते. या आढावा बैठकीत एमटीडीसी रिसॉर्ट्सचा आर्थिक आढावा आणि कामगिरी, अ‍ॅक्वा टुरिझम, प्रादेशिक व्यवस्थापक आणि निवास व्यवस्थापकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या, अभिप्राय व्यवस्थापन, रिसॉर्ट्सचा पायाभूत विकास, मालमत्ता धोरण विकास उपक्रम, विपणन, नवीन रिसॉर्ट्सचे संचालन, आरक्षण पुनरावलोकन, दुरुस्ती देखभाल आणि नूतनीकरण समस्यांचे पुनरावलोकन, पीएमयुद्वारे रिसॉर्ट परिस्थिती विश्लेषण, टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी, सोशल मीडिया मार्केटिंग प्रेझेंटेशन आणि जबाबदार पर्यटन या विषयांवर चर्चा करण्यात आली.
महामंडळाच्या वार्षिक आढाव्यामध्ये गणपतीपुळे पर्यटक निवासांस एपिल 2021 ते माच 2021 या कालावधीतील सर्वोत्तम परफॉर्मन्स असलेले पर्यटक निवास म्हणुन प्रमाणित करण्यात आले असुन रत्नागिरी विभाग सवसाधारण सवोत्तम सरस असल्याचे दिसून आले आहे.
महामंडळाच्या औरंगाबाद विभागाने प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांच्या मार्गदशनाखाली लक्षणिय कामगिरी करताना मागिल वषापेक्षा सरस कामगिरी करत विभागात पर्यटनाला मोठया प्रमाणावर चालना दिली आहे.

औरंगाबाद विभागामध्ये असलेली अजंठा आणि वेरूळ ही जागतिक वारसा स्थळे, औरंगाबादचे ऐतिहासिक महत्त्व या बाबीमळे मागिल वषापेक्षा पर्यटकांनी मोठा पतिसाद दिला आहे. महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी सातत्याने प्रसिध्दी क्षेत्रात कलेले काम, प्रिंट मिडीया आणि सोशल मिडीया मध्ये केलेले महामंडळाचे प्रमोशन यामुळे महामंडळास मोठया प्रमाणावर लाभ झाला आहे.

या बाबींची नोंद घेवून प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांना महामंडळाने खास प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले आहे.
महामंडळाने यावषी अभिनव संकल्पना राबविताना आंतरराष्टीय तृणधान्य वर्षाचे औचित्य साधत आपल्या सर्व उपहारगृहांमध्ये तृणधान्यापासुन तयार करण्यात आलेले पौष्टीक पदार्थ पदार्थ पर्यटकांना देत त्यांच्या आरोग्याची खास दखल घेतली आहे. जबाबदार पर्यटन संकल्पना राबविताना प्लॅस्टिक मक्त परिसर, भारतीय प्रजातीच्या झाडांची लागण केली आहे.

त्यामळे पयावरणाचे रक्षण करण्याबरोबरच प्रदुषण मुक्तीचा संदेशही दिला आहे.

योगा दिनानिमित्त योगाचे धडे, महीला दिनानिमित्त महीलांच्या सन्मानार्थ 50 टक्के सवलत, डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि “वर्क फ्रॉम नेचर” यांना महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येत असल्याने पर्यटकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. कोजागिरी पौणिमा, दिपोत्सव आणि खिसमस हे भारतीय सण पयटक निवासांमध्ये साजरे करून महामंडळाने भारतीय संस्कृती जपली आहे.

“पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोतम प्राधान्य देताना पर्यटनांचा आनंद कमी न होता मा. व्यवस्थापकिय संचालक श्रीमती श्रध्दा जोशी – शर्मा आणि महाव्यवस्थापक श्री.चंदशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संकल्पना राबवुन पर्यटनास वेगळी दिशा देता आली आहे. वर्क फ्रॉम नेचर, मातीच्या भांडयातील जेवण, अनुभवात्मक पर्यटनांअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक कलाकारांना आणि खाद्यपदार्थाना दिलेलं प्राधान्य यांमुळे पर्यटकांना आपल्या पर्यटनाचे प्रसंग संस्मरणीय करता आले. त्यामुळे पर्यटकही निसर्गाचे आणि सरक्षिततेचे भान ठेवुन शासकिय नियमांचे पुरेपुर पालन करीत वर्षा पर्यटनाचा आनंद घेत आहेत.

आगामी आलेल्या लाँग विकएन्ड साठी पयटक निवासे संपूर्णपणे आरक्षित झाली आहेत. आगामी कालावधीत जबाबदार आणि अनुभवात्मक पर्यटनाबरोबरच वेगवेगळया अभिनव संकल्पना राबवुन पर्यटनामध्ये वाढ करण्याचा संकल्प महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांच्या कडुन करण्यात आला आहे”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here