
बारामतीत जागतिक स्तरावरील ‘कृषिक प्रदर्शनाचे आयोजन….!
विविध देशातील एआय तंत्रज्ञान, बियाणे, तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता येणार
बारामती :
भावनगरी
संतोष शिंदे
98 22 73 01 08
येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रामार्फत ‘कृषिक’ हे जागतिक स्तरावरील शेतीविषयक प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शनाचे दि. १६ ते २० जानेवारी कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात राज्यभरातील व परराज्यातीलही शेतकरी सहभागी होणार असून, जगभरातील एआय तंत्रज्ञान, नवे बियाणे, नवे खतव्यवस्थापन, नवे तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतात रुजताना व त्याचे उत्पादनात रूपांतर होताना शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. याबाबत संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी अधिक माहिती दिली.

नव्या जातींची लागवड येथील मातीत कशी होते, याची प्रत्यक्ष माहिती याहारे मिळणार आहे. परदेशी व वाजवी नफा देणारी फळझाडे आपल्या मातीत उत्पादित होतात का? त्याचा खर्च, त्याची बाजारपेठ, त्याचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी शेतकरी बांधवांच्या मनातील अनेक शंकांना उत्तरे मिळणार आहेत. नावीन्यपूर्ण फळझाडांची आपल्या भौगोलिक परिस्थितीतील यशस्वी वाढ या ठिकाणी शेतकरी बांधवांना पाहता येईल.

ठळक: अवाकॅडो, फलम, पिअर, लिची,
कृषि विज्ञान केंद्र बारामती
भारतातील सर्वात मोठे व भव्य प्रात्येक्षिकेयुक्त कृषि प्रदर्शन दि. 16 ते 20 जानेवारी 2025
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी….
शेतकऱ्यांनी यावे व विविध तंत्रज्ञानाची माहिती अवगत करावी व आपल्या शेतीतून आपले उत्पादन कसे वाढेल यासाठी हे प्रदर्शन आकर्षकच…

रामभूतान, मैगोस्टीन, लक्ष्मणफळ, पेशन फ्रूट, खजूर अशा अनेक फळझाडांचा यामध्ये समावेश आहे. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार हे १९८० च्या दशकात अमेरिकेतील मिशिगन स्टेटमध्ये कृषी पदवीचे शिक्षण घेत असताना मिनिसोटा कॉन्टीमध्ये त्यांनी अशा प्रकारचे प्रात्यक्षिक आधारित प्रदर्शन पाहिले होते. नवीन बियाणे, तंत्रज्ञान, खते
केवळ पिशव्यांमधून दाखविण्याऐवजी त्यांचा प्रत्यक्ष शेतीतील वापर, त्यांचा त्या पिकावरील प्रभाव व प्रत्यक्ष उत्पादन पाहता येत असल्याने ते अधिक प्रभावी ठरते. नवीन बियाणे, तंत्रज्ञान, खांचा प्रत्यक्ष शेतातील वापर, त्यांचा पिकावरील प्रभाव प्रत्यक्ष पाहता येणार आहे.
यंदा नेदरलँड, चीन, अमेरिका,
काळी मिरची, तुर्कस्थानची बाजरी

नव्या आतींची लागवड येथील मातीत कशी होते, याची प्रत्यक्ष माहिती याद्वारे मिळणार आहे. भाजीपाला गुणवता केंद्र, परदेशी कटफ्लॉवरची शेती, शेवंतीच्या २९ प्रकारच्या फुलांची शेती, काळा टोमॅटो, २९ प्रकारच्या टोमॅटोचे देशी वाण, निळी लाल केळी, खोड आधारित डाळिंब, बुलेट द्राक्षे, काळा कांदा, स्टार फुट, थायलंडचा फणस, चिया करटोतो, खरबूज, तैवान पेरू, काळी मिरची, तुर्कस्थानची बाजरी, मिलेटचे जास्त उत्फर देणारे वाण आदी पिके व प्रात्यक्षिके पाहावयास मिळणार आहेत. याशिवाय पशुपक्षी प्रदर्शन आणि डॉ. आप्पासाहेब पवार अप्रदर्शन आयोजित केले असल्याचे ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीलेश नलवडे यांनी सांगितले,
वेगवेगळ्या पक्षातील नेते प्रथमच एकत्र येणार बारामतीत उत्सुकता


येत्या १६ ते २० जानेवारीदरम्यान अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजित कृषिक प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (दि. १५) ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्रों माणिकराव कोकाटे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री पंकजा मुंडे पांच्या उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजप, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेते प्रथमच एकत्र येत आहेत. त्यामुळे या प्रदर्शनाची कृषी क्षेत्रासह राजकीय वर्तुळातही उत्सुकता आहे.

इस्रायल, ब्राझील, स्पेन, इटली, जर्मनी, अफ्रिका, फ्रान्स, थायलंड, कोरिया, जपान, इंग्लंड, मेक्सिको, स्वीडन, तुर्कस्थान, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील विविध एआष, सेन्सर व रोबोटिक तंत्रज्ञान वियाणे, खते, औषधे, मशिनरी, पॉलिहाउस, लागवड तंत्रज्ञान, स्मार्ट दुल्स पाहण्याची नामी संधी उपलब्ध होणार आहे.
या देशातील तंत्रज्ञानामध्ये

जपान येथील बायोफ्लॉक यंत्रणा, नेदरलँड, स्पेन, जर्मनी, थायलंड आदी देशांतील विषमुक्त शेती उत्पादनासाठी आधुनिक औषधे, सेन्सर तंत्रज्ञानावर आधारित नेदरलँड, इंग्लंड, अमेरिका देशातील प्रगत मशिनरी, इस्त्रायल येथील सूक्ष्म सिंचनप्रणाली, इटली येथील सेन्सरचलित मशिनरी तंत्रज्ञान असणार आहे.