महाराष्ट्रातील एका छोट्याश्या खेड्यात अठरा विश्व दारिद्र्यात जन्मलेले विश्वव्यापी साहित्य लिहतात हा निसर्गाने जन्माला घातलेला चमत्कारच….!

0
289

जयाची किर्ती जागतिक ! असे आण्णा भाऊ महान साहित्यिक!

साहित्य विश्वात तळागाळातल्या सामान्याचा जीवनातील जगण्यातील स्पंदनाचा आवाज जाणुन त्या त्या आर्ततेला केवळ आधारच नव्हे तर त्यावर जगण्यासाठी मात करणारी शब्दाची डरकाळी फोडली.

ती जाणुन घेण्यासाठी साहित्याचे सिंहावलोकन केले तर ते साहित्य खरोखरच सिंहगर्जनाचेच आहे.हि जाण होऊन वंदनिय आण्णा भाऊ साठे जागतिक किर्तीचे साहित्य रत्न होते हे ठामपणे मांडता येते.
साहित्यरत्न आण्णा भाऊना जगमान्य साहित्यिक म्हणताना अण्णा भाऊ साठेच्या व इतर मानवता सर्वश्रेष्ठ साहित्याचा धांडोळा घ्यावा लागेल.

सामान्य माणसाला समजेल अशा सरळ सोप्या प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरानी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली विश्वात्मके देवे पसायदान मागितले. ज्ञानदेवानी लिहले ते साहित्य ज्ञानेश्वरी ती लिहुन ते ज्ञान-श्वर ज्ञानेश्वर झाले.

आण्णाच्या केवळ पन्नाशीच्या आतल्या ४९ वर्ष ११ महिने १७ दिवसाच्या आयुष्याचा विचार केला तर त्यांच्या आयुष्यातील लिखाणाची सुरुवात हि पंधरासोळाव्या वर्षीच झाली असावी त्यांनी पायी वाटेगाव ते मुंबई हा प्रवास केला होता‌.कोणा न वाटे पायी वाटेने चालणारे जागतिक किर्तीच्या वाटेने चालतील ते त्यांनी साहित्यातील जगण्याच्या आत्मविश्वासाने दाखवुन दिले.अक्षरशुन्य माणसाने शुन्यातुन‌ विश्वनिर्माण केले.अशा ज्ञानी साहित्यिकाला ज्ञान-ईश्वर ज्ञानेश्वर म्हटले तर ते केवळ अतिशयोक्ती म्हणुन न मानता सरळ अर्थाने म्हणणे वावगे ठरणार नाही.

हेच आधुनिक ज्ञानेश्वर हे देखील प्राचीन ज्ञानदेवा प्रमाणे चार भिंतींच्या शाळेत हि न जाता विश्वाच्या शाळेत जगुन, शिकुन साहित्य लिहणारे यांना साहित्यरत्न म्हणणे हे हि सार्थकी आहे.

काळानुरूप असलेल्या शब्द भांडाराना आपण विविध नावाने संबोधले तरी त्याचा मतितार्थ हा शब्दाची रचना हि सामान्यांच्या जीवनाचा आरसा दाखविणारे असावी तोच आरसा ज्ञानेश्वराची ज्ञाने-श्वरीने दाखवला. सोळाव्या शतकात संत तुकारामानी लिहलेल्या गाथा अभंग,ओव्या लिहून‌ दाखवला तसाच आरसा एकविसाव्या शतकातील तुकारामांनी म्हणजेच आण्णांनी लिहलेले पोवाडे लावणी, नाटक, लोकनाट्य, प्रवास वर्णन कथा कादंबरी हे समाज प्रबोधन करणारे साहित्य सामान्य माणसांना दाखविले.

हे तत्कालीन व सांप्रत जिवनाशी प्रबोधनाची गाठ बांधण्या इतकेच अनमोल म्हणावे लागेल सोळाव्या शतकातील संत तुकाराम हे विद्रोही संत तर एकवीसव्या शतकातील तुकाराम तथा आण्णा हे देखील विद्रोही साहित्यिक आपल्या साहित्यातुन विश्वाचे दर्शन घडविणारेच उभय,
गीतेंच्या श्लोका प्रमाणे यदा यदा धर्मस्य प्रमाणे हे जन्माला आलेले विश्वाचे दर्शन घडविणारे,

ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीत, तुकारामांच्या गाथेमध्ये पाहिले तर मानवता धर्माचे चित्र उभे राहते.तर तुकाराम तथा आण्णा यांच्या साहित्यात हि मानवता धर्मच सत्तु भोसले व फकिरा यांच्या जिवाला जीव देणाऱ्या मैत्री मधुन दिसुन येतो.

धर्मांधाना पुरोगाम्यान्या धर्माशी जोडलेले हे बंध मान्य होणार नाही.परंतु त्याचा गाभा हा एकच संत चोखोबानी म्हटले आहे.ऊस डोंगा परी रस नव्हे. ज्ञानेश्वराचा संत तुकारामांचा काळाकडे आपण धर्म म्हणून पाहत असलो तरी त्यांचा धर्म हा सनातन धर्म नव्हता.तर तो वारकरी सांप्रदायिक धर्म होता.त्यांचा गाभा सनातन धर्मावर आसुड ओढुन मानवता धर्म रूजविणारा असाच होता ते आण्णाच्या साहित्यात दिसुन येते.

ज्ञानेश्वराना तुकारामांनाच्या तत्कालीन साहित्याला जगमान्यत मिळते तीच जगमान्यता आण्णा भाऊना देखील मिळते.त्यांचे साहित्य बावीस भाषेत प्रकाशित होऊन जगमान्यता मिळाली आहे.पुणे येथील सावित्रीबाई फुले महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डाॅ.बजरंगजी कोरडे यांनी आण्णाचे चरित्र प्रथम इंग्रजीत लिहले.आज त्यांचे अनेक भाषेत भाषांतरीत पुस्तके प्रकाशित झाली हे आण्णा भाऊ वरील साहित्याचे जागतिकीकरणच

आण्णा भाऊंचे मुळ साहित्य हे देखील जागतिक किर्तीचे आहे महाराष्ट्रातील एका छोट्याश्या खेड्यात अठरा विश्व दारिद्र्यात जन्मलेले विश्वव्यापी साहित्य लिहतात हा निसर्गाने जन्माला घातलेला चमत्कारच म्हणुनच विश्वात आण्णा वंदनिय त्यांना नमस्कार केला जातो.

आण्णा या साहित्यिकाचे पुतळे रशियात उभारले गेले. रशिया देश आई हि जगमान्य कादंबरी लिहणारे जागतिक किर्तीचे साहित्यिक मॅक्सिम गाॅर्की संबोधित होते.तेच भारतातले गाॅर्की आण्णांना रशियात संबोधले जाते.ज्ञानपिठा पेक्षा हि महानता या उपाधित आहे.

अण्णाभाऊच्या जागतिक किर्तीच्या साहित्यावर दृष्टीक्षेप टाकला तर भारतमातेचे सुपुत्र राजा छत्रपती शिवाजी राजे यांचा स्वरचित पोवाडा जगाच्या इतिहासात प्रथम रशियात आण्णांनी गायला.

स्तालिनग्राडचा पोवाडा त्यात ते म्हणतात “दलिताचे आशाकीरण!रशियाचा प्राण जंगी ज्यां लढविले रोस्तोव!आणि रक्षिले लेनिनग्राड माॅस्को नाझीचा काळ हि झाली.रशियन क्रांती

बंगालची हाक देखील त्यांनी मांडली बंगाल मारतो हाका! भारतिय युवका!उठ आता वाचवा त्याला धरा सावरुन!सर्व जनतेत ऐक्य उभारून! निराशा दुर्बलता झुगारून!

एवढ्यावरच आण्णा जगाशी ओळख करुन देत नाहीत तर जगच बदलुन टाक सांगुन गेले मला भीमराव म्हणतात.

जगाच्या नकाशावर असणारी ब्रिटिशाचे औद्योगिक शहर मुंबईवर आण्णा लावणी करुन मुंबईच्या विषमतेची जगाला जाणिव करुन देतात.मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी! कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती! परळात राहणारे! रातदिवस राबणारे, मिळेल ते खाऊनी घाम गाळती!

मुंबई ते माॅस्को, रशियातील भ्रमंती,माॅस्को ते लेनिनग्राड
बाकीकडे,ताश्कंद ते दिल्ली पंजाब दिल्लीचा दंगा ,
आजच्या सारखे सॅटेलाईट व्दारे जग त्याकाळी जवळ नव्हते,भारताचे हि इतर देशांशी असणाऱ्या संबंधांचा फारसा ओहापोह होत नव्हता.तसे प्रचलित असते तर आण्णांनी भारतीयांना निश्चितच आपल्या साहित्यातुन जगाची ओळख करून दिली असती.

आण्णा केवळ ४९ वर्षाचे आयुष्य लाभले त्यात आण्णा केवळ भिंतीवरच्या. कलेंडर प्रमाणे १८ जुलै (निधन) आधी गेले व १ ऑगस्ट नंतर जन्मले हे वास्तवातले सत्य देखील आहे.आण्णाची ओळख जगाला आधी झाली असली तरी,आम्हा भारतिया उशिरा झाली.खऱ्या अर्थाने आजही पुर्णता झाली नाही.ती झाली असती तर भारतरत्नचे सर्व‌ नियमांची पायमल्ली करून धनदांडग्याना व लबाड लांडग्याना भारत रत्न दिले आण्णा भाऊ साठे मात्र वंचित राहिले.

रशिया सारखे बलाढ्य राष्ट्र आण्णाचा यशोशिखरावर नेणारा गौरव करीत असताना,एक दळभद्री लेखक हा आपली नतद्रष्टेच प्रदर्शन करीत,आण्णा भाऊची दर्दभरी दास्तान लिहतात.आण्णांनी कधीही आपल्या दुःखाची कहानी जगा पुढे मांडली नाही तर सामान्य माणसाच्या हुंकारा वर स्पंदनाच्या वेदनेवर फुंकरच घातली.

दिड दिवस शाळेत जाऊन हि विश्वाचे जगणे,विश्वात जगणारे महान साहित्य आण्णानी साकारले‌.आण्णा भाऊच्या साहित्यात स्वतःच्या जगण्याचे कधीच वेदनादायी ओंगळ साहित्य नव्हते.तर न शिकता हि कसदार लिहल्या इतका दांडगा आत्मविश्वास ठायी ठायी त्यांना होता.तरी हि आण्णा भाऊची दर्द भरी दास्तान या शिर्षकाने त्यांचा,त्यांच्या अनुयायांचा विश्वासघात सवंग लोकप्रियतेसाठी एक गल्ला भरू लेखकाने केला.हा कपाळ करंटेपणा त्यांनी
आडपडद्याने दाखवुन दिला.

हि भारतीयाची मानसिकता पाहुन चिड येत असली तरी अल्पवयात प्रतिकुल परिस्थित हि विश्वमान्य ज्ञानोबा,तुकोबांच्या तत्कालीन साहित्या इतकेच आजचे आण्णांचे साहित्य हे विश्वव्यापी असल्यामुळे भारतरत्न पासुन वंचित असणारे आण्णा विश्वरत्न विश्वव्यापी साहित्यिक आहेत.याचा अभिमान त्यांच्या साहित्याचा एक पाईक म्हणुन लेखन करीत असणाऱ्या माझ्यासारख्या जेष्ठ साहित्यिकाला वाटतो.त्यांचे स्मृती दिनी
विनम्र अभिवादन…!


आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here