महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे अभिवादन
पुणे, दि.१४: विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, तहसीलदार सूर्यकांत येवले, निवासी नायब तहसीलदार शंकर ठुबे आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त कार्यालयात महामानवाला अभिवादन

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

