मतीमंद व मुकबधीर शाळेत लिनेस क्लब ऑफ बारामती यांचे तर्फे केली रंग पंचमी साजरी.

बारामती कसब्यातील बाल कल्याण केंद्र, मतीमंद व मुकबधीर शाळेतील निवासी विद्यार्थ्यां समवेत लिनेस क्लब बारामती यांचे तर्फे इकोफ्रेंडली रंग खेळुन रंग पंचमी साजरी करण्यात आली.

सदर बाल कल्याण केंद्रामध्ये पहिली ते दहावीचे सुमारे 200 मतीमंद व मुकबधीर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.यामधे 30 विद्यार्थी निवासी आहेत.मुलांनी रंगाची मुक्त पणे उधळण करीत रंग पंचमी साजरी केली.यावेळी अध्यक्ष लि.उज्वला शिंदे, उल्का जाचक, विजया कदम डॉ हर्षदा शिंदे, संध्या सस्ते, ईरा जाचक व शाळेतील शिक्षक स्टाफ उपस्थित होते.सर्वांनीच रंग पंचमी चा आनंद लुटला.क्लबच्या वतीने इंदिरा गांधी व लोकमान्य टिळक यांचे फोटो शाळेला भेट देण्यात आले.यावेळी शाळेच्या प्रमुख मालती खैरे यांचे सहकार्य मिळाले.

