भ्रष्टाचाराने विकास झाला भकास !
योजनाची खैरात करु लागले सत्ताधारी दिलखुलास!
भाकड गाईची दुधाळ झाली कास!
लांगुलचालन करण्या योजना आल्या झकास!
लाडक्या बहिणीसाठी योजना आली खास!
आधारकार्डावर अर्ध्या तिकीटात करा,एस टि ने प्रवास!
अमृतमहोत्सवी पंच्याहत्तरीत
मोफत एस टीची बस!
विचारवंत म्हणती भीक नको आवरा सवलतीच्या कुत्र्यास!
हैराण झाली जनता भरुन जी एस टी टॅक्स!
जिकडे पाहावे तिकडे जनतेच्या माथी वनवास!
कर्जबाजारी राज्य होई तिजोरीचा ऱ्हास!
राजकारणाच्या दारी मात्र कोट्यावधीची रास!
कर्जबाजारी राज्य दुष्काळात सवलतीचा अधिक मास!
तरुणाई रोजगारापायी झाली उदास!
नाही पाऊस पाणी शेतकऱ्यांच्या पिकास!
शहरात घातला पावसाने हैदोस!
रस्ते नदी नाले तुंबले,शहर बुडले माणसाने छळले निसर्गास!
शेतकरी सामोरी जातो अस्मानी, सुलतानी संकटास!
राजकारण्याना निवडणूका जिंकण्याची लागली आस!
मग्रुर उन्माद नेता होऊ लागला मतदारांचा दास!
तेरड्याच्या फुलाला हि येई मोगऱ्याचा वास!
पालवी फुटु लागली गाजर गवतास!
काळ्या जाकीटास हि येऊ लागला गुलाबी वास!
राजकारणात लागे ढवळ्यास पवळ्याचा सहवास!
सत्ताधाऱ्यांस चिंता कसे सामोरी जाऊ निवडणुकीच्या पर्वास!
विरोधक हि आता रोखुन धरु लागले श्वास!
सत्ता काळात लुटुन खाल्ले ज्याने त्याने बिनधास!
लुटुन खाण्यात स्वकिय शासन प्रशासनाने लाजविले ब्रिटिशास!
मतदार राजा हो जागा मतदान कर आता सज्जनास!
ठावुक आहे मजला कसा शोधशील भांगेतल्या तुळशीस !
त्यातल्या त्यात निवड दगडापेक्षा हि मऊ विटेस!
नको पाहु जातपात धर्म,पंथ शोध आता माणुसकीतल्या माणसास!
दात हि आपले ओठ हि आपले खडा लागलेला चावुन खा घास!
शहिदांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य दिले देशास
दुर्दैवाने द्यावा लागतो दोष स्वातंत्र्यातल्या स्व,तंत्रास
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता