प्रतिनिधी : बारामती अजित पवार यांनी केलेला विकासात्मक कामे याचा दाखला देत ,भारतीय जनता पक्षाच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर हल्लाबोल, अजित पवारांचे कौतुक
बारामती, 8 नोव्हेंबर 2024 – भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा दक्षिण शाखेतर्फे आज नटराज कलादालन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत प्रदेश प्रभारी व कर्नाटकचे मा. उच्च तंत्र शिक्षण मंत्री सी. टी. रवी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी सी. टी. रवी यांनी म्हटले की काँग्रेस वारंवार वादा करते परंतु तो पूर्ण करत नाही.तर भाजप सरकार जे बोलते ते विकासकाम झाल्याच्या कार्यक्रम करत असते .असे सांगत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काँग्रेसवर टीका करताना असे सांगितले की, “भाजप पक्ष हा नेहमीच भविष्याचा विचार करूनच पुढील भूमिका घेत असतो.” त्यांच्या मते, भाजपा आधी विकास कामे करते आणि मग कार्यक्रम करते, असे त्यांनी पत्रकार परिषदेत ठामपणे बजावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील सभा १२ नोव्हेंबर २०२४ रोजी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांना समर्थन देण्यासाठी ही सभा आयोजित केली जात आहे. ही सभा पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानात होऊ शकते, मात्र अंतिम कार्यक्रमाचे तपशील अजूनही निश्चित केले जात आहेत.
या सभेसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत.
तसेच , सी. टी. रवी यांनी या प्रसंगी अजित पवार यांच्या कार्याचे कौतुक केले. बारामतीतील त्यांच्या कामाबद्दल सकारात्मक भावना व्यक्त करताना त्यांनी आशा व्यक्त केली की अजित पवार चांगल्या मताधिक्याने बारामतीतून निवडून येतील.
यावेळी बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, प्रदिप गारटकर, अभिजित देवकाते, सतीश फाळके, गोविंद देवकाते यांच्यासह विविध कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.