भारतरत्न भिमराया..
पाजिलेस वाघिणीचे दूध
शिकवलेस अन्यायाविरुद्ध लढाया
भारतरत्न भिमराया..
रस्त्यावरच्या दिव्याखाली केला तुम्ही अभ्यास…
दीनदुबळ्यांसाठी लढणं हाच तुमचा ध्यास…
खंडप्राय देशाला अखंड तेच्या धाग्यात गुंफिले संविधान..
या संविधानाचा देशाला अभिमान…
काश्मीर पासुन कन्याकुमारी पर्यंत..लागला तिरंगा फडकाया…
भारतरत्न भिमराया…
तुझ्या पावन स्पर्शाने झाले चवदार तळे..
आयुष्यात जनमानसांच्या फुलविले क्रांतीचे मळे…
विनम्र होऊन आज जग सारें पडतय पाया..
भारतरत्न भिमराया..
नितीन कुमार शेंडे
बारामती