भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिणची कार्यकारिणी जाहीर : जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांची घोषणा…!

0
11

भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिणची कार्यकारिणी जाहीर : जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांची घोषणा…!

पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिणच्या जम्बो कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी मोठ्या उत्साहात केली. मुख्यमंत्री आ. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, वरिष्ठ नेते ना. चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री ना. मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हा समन्वयक आमदार ॲड. राहुल कुल आणि माजी जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या मान्यतेनुसार ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी पदाधिकाऱ्यांची घोषणा करताना सांगितले की, “नव्या कार्यकारिणीतून संघटनेला बळकटी मिळणार आहे. सर्व पदाधिकारी एकदिलाने, जोमाने आणि निष्ठेने भाजपाचा झेंडा घराघरात पोहोचवतील. आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ही कार्यकारिणी प्रभावीपणे काम करेल.”
जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
जिल्हा महामंत्री – आकाश कांबळे, बाळासाहेब गरुड, गंगाराम जगदाळे, वैशाली सणस

जिल्हा उपाध्यक्ष – पांडुरंग कचरे, राहुल शेवाळे, हरिचंद्र ठोंबरे, जीवन कोंडे, संभाजी काळाने, शिवाजीराव निंबाळकर, सुनील जागडे, अंकुश गायकवाड

जिल्हा चिटणीस – दीपक तनपुरे, सागर चिंचकर, वैशाली धसाडे, आशाताई शिवतारे, नाना शेंडे, शहाजी कदम, गणेश भोसले, योगेश डाबी
कार्यालयीन प्रमुख – धनंजय कामठे जिल्हा मोर्चा अध्यक्ष युवा मोर्चा – वैभव सोलनकरमहिला मोर्चा – स्नेहल दगडेकिसान मोर्चा – दिग्विजय काकडेओबीसी मोर्चा – गजानन वाकसे अल्पसंख्यांक मोर्चा – आशिष ओसवाल अनुसूचित जाती मोर्चा – मयूर कांबळे आघाडी व प्रकोष्ठ प्रमुख :सोशल मीडिया – संदेश धायगुडेज्येष्ठ नागरिक आघाडी – बापू लोखंडे कायदा आघाडी – ॲड. गोविंद देवकाते दिव्यांग आघाडी – बाजीराव पारगे उद्योग आघाडी – सतीश फाळके उत्तर भारतीय आघाडी – नागेंद्र चोबे वैद्यकीय आघाडी – डॉ. सुमित काकडे बुद्धिजीवी आघाडी – शैलेंद्र ठकार पदवीधर आघाडी – दीपक राजपूत राजस्थान प्रकोष्ठ – दिनेश शर्मा व्यापार आघाडी – प्रवीणकुमार शहा अध्यात्मिक आघाडी – अशोक चव्हाण पदाधिकाऱ्यांची भावना या निवडीबद्दल नव्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आणि भाजपाच्या तत्त्वज्ञान व विकासाच्या ध्येयाने पुढे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

जिल्हा ग्रामीण दक्षिणमध्ये कार्यकारिणीच्या या जाहीरनाम्यामुळे भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक वाढली असून आगामी निवडणुकांत पक्षाला नक्कीच मोठा फायदा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here