पुणे (दि.२८) भरत मित्र मंडळ महाशिवरात्र उत्सव समितीच्या वतीने कै.राघोबा व कै बबुबाई दाभेकर यांच्या स्मरणार्थ भव्य हाप पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.यात १६ संघांनी भाग घेतला. ही स्पर्धा माती गणपती मंडळाने जिंकली. त्यांना पहिले पारितोषिक ११ हजार रोख व चषक प्रदान करण्यात आला.तर दुसरा क्रमांक बस कंपनी ग्रुपने जिंकला.त्यांना ५ हजार रोख व चषक प्रदान करण्यात आला.पेपर गल्ली शनिवारपेठ येथे संपन्न झालेल्या या स्पर्धा प्रसंगी निरंजन दाभेकर अध्यक्ष शिवा फौंडेशन, बाळासाहेब दाभेकर अध्यक्ष महाशिवरात्र उत्सव समिती अंकुश काकडे माजी महापौर, ओंकार शिंदे,राजेंद्र पंडित,नंदू लाहोटी आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते
