बालकविता
मोबाईल नाही शत्रू
मोबाईलच्या अतिवापराने
खेळ मैदाने भकास झाली
चिंगी, सोन्या ,गोट्याची
किलबिल कधीच हरवून गेली
मोबाईल घेऊन बसतो आम्ही
विसर पडतो साऱ्यांचा
रात्रीच्या आकाशातला
खेळ विसरलो तार्यांचा
मोबाईलच्या गेम पुढे
चिखल ,माती दूर गेली
विटी- दांडू ,गोट्या,चकारी
कधीच इतिहास जमा झाली
मोबाईलच्या अतीवापराने
डोळे चांगले राहत नाही
दगडाने कैरी पाडण्यासाठी
मित्रांचा जम बसत नाही
मोबाईल मुळे खरंच सांगते
बाग बगीचे ओसाड झाली
बागेतली सारी खेळणी
मुलांसाठी व्याकुळ झाली
सुट्ट्या साऱ्या मोबाईल मध्ये
नका रे पोरांनो घालवू
कुल्फीची ती घंटी ऐकताच
मधमाशा सारखे बाहेर पडू
मोबाईल नाही शत्रू आहे मित्र
तरीही नको अती देवा
मोबाईल थोडा बाजूला सारून
जपू बालपणीचाअमूल्य ठेवा
ऐका सांगते मुलांनो तुम्हाला
मोबाईल गरजे पुरता वापरा
नाहीतर तुमचे बालपण हे
होऊन जाईल कैदेचा पिंजरा
©️ अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.
७७०९४६४६५३