बारामती हाफ मॅरेथॉन २०२५: क्रीडा व आरोग्याचा उत्सव
बारामती—क्रीडा आणि आरोग्याचा संदेश देणाऱ्या तिसऱ्या बारामती हाफ मॅरेथॉन २०२५ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शरयु फाउंडेशन यांच्या विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या या भव्य स्पर्धेमध्ये देश-विदेशातील धावपटूंनी सहभाग घेतला.

प्रसिद्ध बॉक्सर आणि ऑलिम्पिक पदक विजेते विजेंदर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत या मॅरेथॉनचा जल्लोषात शुभारंभ झाला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, उद्योजक श्रीनिवास पवार, युवा नेते युगेंद्र पवार, तसेच विविध उद्योग आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हाफ मॅरेथॉनच्या आयोजनामागील प्रमुख हेतू म्हणजे निरोगी जीवनशैलीचा प्रचार आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे. यंदाच्या स्पर्धेत केवळ भारतातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनीही मोठ्या संख्येने भाग घेतला. विविध वयोगटांतील स्पर्धकांसाठी २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि फनरन असे वेगवेगळे गट ठेवण्यात आले होते.

शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी या स्पर्धेबाबत बोलताना सांगितले,
“बारामती हाफ मॅरेथॉन केवळ एक स्पर्धा नसून, ती एक आरोग्यदायी चळवळ आहे. धावण्यासारखा खेळ शरीर आणि मन दोन्हीसाठी उत्तम आहे. यामुळे तरुणांमध्ये फिटनेसबाबत जागरूकता निर्माण होते.”

स्पर्धेचा थरार आणि विशेष आकर्षण बारामती हाफ मॅरेथॉनची सुरुवात पहाटे ५.३० वाजता झाली. स्पर्धेसाठी शहरातील प्रमुख रस्ते आकर्षक पद्धतीने सजवले गेले होते. स्पर्धकांसाठी योग्य व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सोय, नाष्टा, वैद्यकीय मदत आणि स्वयंसेवकांचा उत्तम सहभाग दिसून आला.

प्रमुख आकर्षण:
विजेंदर सिंह यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन – उद्घाटन प्रसंगी त्यांनी सांगितले,

“यशासाठी कठोर मेहनत आणि सातत्य महत्त्वाचे आहे. शारीरिक तंदुरुस्ती ही फक्त खेळाडूंसाठीच नाही, तर प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे.”
खा. सुप्रिया सुळे यांचा फनरनमध्ये सहभाग – त्यांनी स्वतः या स्पर्धेत भाग घेतला आणि आणखी खेळाडूंनी धावण्याची सवय लावावी, यासाठी प्रेरणा दिली.
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष वॉकेथॉन – सामाजिक उत्तरदायित्वाच्या दृष्टिकोनातून या गटातील स्पर्धकांसाठी खास स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
विजेते गौरव सोहळा
स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर विजेत्यांना रोख पारितोषिके, स्मृतिचिन्हे आणि पदके देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्यांच्या कामगिरीचे कौतुक करताना बारामती रनर्सचे डॉ. पी. एन. देवकाते म्हणाले,
“या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेला प्रत्येक धावपटू विजेता आहे. धावण्याची सवय हीच तुमच्या आरोग्यासाठी मोठे बक्षीस आहे.”
स्पर्धेतील यशस्वी आयोजन आणि प्रतिसाद तिसऱ्या वर्षीही… हाफ मॅरेथॉनने बारामतीकरांना अभिमान वाटावा अशी ओळख निर्माण केली आहे…!
या स्पर्धेने केवळ क्रिकेट किंवा कबड्डी सारख्या पारंपरिक खेळांपेक्षा धावण्यालाही मोठे व्यासपीठ मिळाले आहे. बारामतीकरांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेत या स्पर्धेचा उत्सव साजरा केला.
“हाफ मॅरेथॉन म्हणजे फक्त एक शर्यत नाही, तर ती बारामतीच्या वाढत्या आरोग्य आणि क्रीडा संस्कृतीचे प्रतीक आहे,” असे मत आयोजकांनी व्यक्त केले. यामध्ये झुम्बा डान्स, झुंबा, शशांक मोहिते यांचे सूत्रसंचालन तेवढेच बहारदार होते. या स्पर्धेसाठी अनेकांनी स्वतःहून सहभाग नोंदविलाचे दिसून आले…
बारामती हाफ मॅरेथॉन २०२५ हे आरोग्य व खेळाडूवृत्तीचा एक अनोखा संगम ठरला!
