बारामती विधानसभा मतदार संघात माळी समाज मेळावा…!

0
45

प्रतिनिधी : बारामती विधानसभा मतदारसंघात नुकताच आयोजित केलेल्या भव्य माळी समाज मेळाव्यात, अजित पवार यांना १०० टक्के पाठिंबा देण्यात आला आहे.

अक्षता मंगल कार्यालयात भरगच्च उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याचे नेतृत्व राज्यसभा खासदार सौ. सुनेत्रा पवार यांनी केले. या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष कल्याण राव आखाडे, तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगांबर दुर्गाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तरुणांपासून जेष्ठांपर्यंत अनेक नागरिकांनी या मेळाव्यात हजेरी लावून अजित पवारांना पाठिंबा दर्शवला. समाजाच्या एकतेचे आणि सहकार्याचे प्रतीक म्हणून, मेळाव्यातील लोकांनी “अजित दादा आगे बढो” असा उत्स्फूर्त जयघोष केला.

अजित पवार यांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना समान वागणूक देण्याचा जो विकासाचा मार्ग अवलंबला आहे, त्याचे माळी समाजाने विशेष कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here