बारामती येथे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा संपन्न
बारामती दि. १६ : क्रीडा विभागाच्यावतीने बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात जिल्हास्तरीय मैदानी खेळाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन तहसिलदार विजय पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांनी केले.
यावेळी तालुका क्रीडा अधिकारी बारामतीचे अनिल सातव, आंबेगावचे आमसिध्द सोळनकर, दौंडचे महेश चावले, डॉ. गौतम जाधव, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील १४, १७, व १९ वयोगटातील मुले व मुलींच्या संघांनी सहभाग नोंदवला. लांबउडी, उंचउडी, तिहेरीउडी, गोळाफेक, थाळीफेक, धावणे, ४०० मी. रिले व भालाफेक स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.