बारामती येथील रूई रुग्णालयात क्षयरोग दिन साजरा….!
![](https://bhavnagari.in/wp-content/uploads/2023/03/IMG20230324105906-1024x461.jpg)
प्रतिनिधी :आज दि.२४ मार्च रोजी बारामती येथील रूई रुग्णालयात क्षयरोग दिन साजरा..
मार्च २४ क्षयरोग हा अनंत काळापासून मानव जातीस लागलेला भयंकर रोग आहे. क्षय या शब्दाचा अर्थ झीज. निरोगी माणूस हा रोग झाल्यावर कणा कणाने झिजून नष्ट होत असे म्हणून या रोगास राजयक्ष्मा किंवा क्षय असे नाव दिले आहे. क्षयरोगाविषयीची विविध माहिती
यावेळी उपस्थित रुई रुग्णालयाचे अधिक्षक श्री. डॉ. सुनिल दराडे, श्री. डॉ. संजय घुले डॉ. सरिता देवकाते, श्री. पाटणकर श्री. जाधवर, तसेच परिचारिका गायकवाड मॅडम, मोरे मॅडम अन्य सर्व कर्मचारी वृंद व रुग्णांचे, नातेवाईक उपस्थित होते.
श्री .डॉक्टर दराडे यांनी पुढे माहिती देताना म्हटले की
क्षयरोग हा क्षयजंतूपासून होणारा सांसर्गिक रोग आहे. एका क्षयरोग्यापासून दुसऱ्यास क्षयरोग होतो. मुख्यतः हा रोग क्षयरोगाच्या थुंकीच्या फवाऱ्यात सापडलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या फुफ्फुसात क्षयजंतू गेल्यामुळे पसरतो. क्षयरोग्याच्या खोकण्या- थुंकण्यामुळे जमिनीवर धुळीत क्षयजंतू मिसळतात व वाऱ्याबरोबर इतरत्र वाहत जाऊन माणसाच्या शरीरात जाऊ शकतात. ज्या व्यक्तींची मुळातच प्रतिकार क्षमता कमी असते अथवा मधुमेह, ताणतणाव, एड्सची बाधा, कुपोषण यासारख्या गोष्टींमुळे प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते. त्यांच्यामध्ये क्षयरोग वाढून फुफ्फुसामध्ये दाह निर्माण होतो व फुफ्फुसांना इजा होते. अथवा काही रोग्यात हे जंतू रक्तावाटे, लिम्फ व स्वावावाटे शरीरात इतरत्र पसरतात. त्यामुळे मेंदूचा क्षय, लिम्फागाठींचा क्षय, आतड्याचा क्षय, हाडांचा क्षय किडनी अथवा जननेंद्रियांचा क्षय होऊ शकतो. म्हणजेच क्षयरोग शरीराच्या कुठल्याही भागाला होऊ शकतो. औषधाला दाद न देणारा खोकला व दोन आठवड्यापेक्षा अधिक टिकणारा खोकला, छातीत दुखणे, श्वा
![](https://bhavnagari.in/wp-content/uploads/2023/03/IMG20230324105909-1-1024x425.jpg)
लागणे, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे आणि रोज संध्याकाळी अंग गरम अगदीच कोरोनाचे लक्षणे देखील निदर्शनास येतात..! म्हणून सर्वतोपरी सर्वांनी स्वच्छता बाळगावी स्वच्छ हात धुवावेत सॅनिटायझर करून घ्यावे नियमित आहार व व्यायाम करून योग्य ती शरीराची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.
![](https://bhavnagari.in/wp-content/uploads/2023/03/IMG20230324105909-1024x425.jpg)