बारामती बाजार समिती मध्ये शनिवार पासुन कापुस विक्रीस शुभारंभ

0
34

बारामती बाजार समिती मध्ये शनिवार पासुन कापुस विक्रीस शुभारंभ
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड मध्ये चालु हंगामातील कापुस विक्रीचा शुभारंभ शनिवार दि. १६ नोव्हेंबर २०२४ पासुन होत आहे. बारामती मुख्य यार्ड मध्ये दरवर्षी प्रमाणे कापुसाचे लिलाव उघड पद्धतीने होत असतात. तसेच शेतमालाचे वजन लिलावापुर्वी आणि त्यानंतर लिलाव अशी पद्धत असल्याने शेतक-यांनी आपला माल चांगल्या पॅकींग मध्ये आणि स्वच्छ व ग्रेडींग करून आणावा. बारामती बाजार आवारात कापसास प्रतवारीनुसार योग्य दर मिळत असल्याने शेतक-यांनी आपला कापुस खाजगी बाजारपेठेत विक्री न करता बाजार आवारात विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे.
कापसाची लागवड परिसरात वाढत असल्याने बारामती बाजार समितीने शेतक-यांच्या सोयीसाठी २०२२ पासुन कापसाचे उघड लिलाव पद्धत सुरू केली आहे. या कालावधीत १६०० क्विंटलची आवक होऊन कापसाला कमाल रू.९३००/- तर सरासरी रू. ६९५१/- असा प्रति क्विंटल दर मिळाला आहे. आवारातील आडते तसेच स्थानिक व बाहेरील खरेदीदार असल्याने यावर्षी कापसाला योग्य व सर्वाधिक दर मिळतील अशी अपेक्षा आहे. मुख्य बाजार आवारात आठवड्यातील बुधवार व शनिवार या दिवशी सकाळी ११.३० वाजता लिलाव घेतले जातील अशी माहिती बारामती मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here