बारामती
बारामती बाजार समिती मध्ये नवीन उडीदाला प्रति क्विंटल रू. ७८०० दर
बारामती बाजार समिती मध्ये चालु खरीप हंगामातील नवीन उडीदाची आवक सुरू झाली असुन सोमवार दि. २३ सप्टेबर २०२४ रोजी आडतदार अशोक सालपे व शिवाजी फाळके यांचे आडतीवर शेतकरी विनोद सणस, माळेगाव व संतोष गावडे, मेडद यांचे उडीदाला प्रति क्विंटल रू. ७८०० असा उच्चांकी दर मिळाला तर उदीडाचे सरासरी रू. ७३५१ दर निघाले असुन खरेदीदार सिद्धार्थ गुगळे व अमोल वाडीकर यांनी खरेदी केला. त्यामुळे शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. बारामती बाजार समिती मध्ये लिलावापुर्वी शेतमालाचे इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मापाड्या मार्फत अचुक वजन, योग्य बाजारभाव व त्याच दिवशी पट्टी याच विश्वासर्हतेमुळे आसपासच्या तालुक्याती शेतकरी शेतमाल घेऊन येत असल्याचे बाजार समितीचे सभापती सुनिल पवार व उपसभापती निलेश लडकत यांनी सांगितले.
यंदा वेळेत व समाधानकारक पाऊस पडल्याने उडीदाच्या पेरण्या वेळेत झाल्या आहेत. त्यामुळे उडीदाचे चांगले उत्पादन मिळत आहे. बारामती बाजार समिती मध्ये आवक मोठ्या प्रमाणात येत असुन नवीन स्वच्छ व वाळलेल्या उडीद या शेतमालास इतर बाजार समित्या पेक्षा खूप चांगले बाजारभाव मिळत असल्याने बारामती चे परिसरातून शेतमाल विक्रीसाठी बारामती मध्ये शेतकरी माल आणतात असे बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले. उडीदाला आणखी दर वाढण्याची शक्यता असल्याने शेतक-यांनी आपला माल स्वच्छ व वाळवुन आणावा असे आवाहन बारामती बाजार समिती तर्फे करणेत येत आहे.