बारामती नगर परिषदेचा 159 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

0
178

बारामती नगर परिषदेचा 159 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

दिनांक 01/01/ 2024 सोमवार रोजी बारामती नगर परिषदेला 158 वर्ष पूर्ण झाली ,159 व्या वर्षात बारामती नगर परिषदेची घोडदौंड मोठ्या रुबाबदाकार तितक्याच जबाबदारपणाची बारामती नगरपरिषद बारामतीचे दूरदृष्टीचे नेते व समस्त स्थानिक बारामतीकर नागरिक बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष,नगरसेवक, मुख्याधिकारी कर्मचारी वृंद त्यांचे कार्य कौशल्य बारामतीच्या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून दिसून आलेले आहे.काल दि.01/01/2024 ला बारामती नगर परिषदेला 158 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने 159 वा वर्धापन दिन साजरा होताना जो काही प्रत्येक बारामतीकर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना व बारामती नगर परिषदेला शुभेच्छा व्यक्त करतानाचा आपला आनंद प्रत्येकातील तो अविरतपणाचा भाव बारामती नगर परिषदेच्या या समारंभ प्रसंगी त्या माध्यमातून दिसून येत होता. बारामती नगर परिषदेच्या 159 व्या वर्धापन दिनास प्रत्येक बारामतीकर अंतकरणातून हृदयस्पर्शी शुभेच्छा व्यक्त मनातून करत होता .प्रत्येक बारामतीकरांची नगरपरिषद व नगरपरिषद बारामतीची हा एक आगळावेगळा असा रुणानुबंदाचा सहवास दररोजच्या आपल्या सह जीवनात नगरपरिषद आणि बारामतीकर हे नाते अतूट होऊन प्रत्येक बारामतीकरांनी एका वस्या प्रमाणे घराप्रमाणे बारामती नगर परिषदेला जोपासलेले आहे. आपल्या बारामतीचे स्वच्छता आपल्या घराप्रमाणे व्हावी करिता सर्वजण नगर परिषदेला सहकार्य तर करतातच परंतु येथील प्रशासन व्यवस्था व प्रशासनातील अधिकारी त्याचबरोबर नेते मंडळी व त्यांचे बहुमूल्य योगदान या बारामतीच्या विकासात्मक गोष्टीला दिसून येते. बारामती मध्ये पुण्याप्रमाणेच काय ऊणे अशी ख्याती प्राप्त झाल्याकारणाने हरित, स्वच्छ, सुंदर ,आरोग्यदायी बारामतीचे चित्र पालटण्याचे कार्य तुम्हाआम्हांच्या सर्वांच्या दूरदृष्टीतून झाल्याचे 159 व्या वर्षात बारामती नगरपरिषद पदार्पण करीत असताना नगरपालिकाचे ते विलोभनीय चित्र पाहून खरोखरच एक आनंद अंतकरणातून दाटून आला एक बारामतीकर म्हणून सांगू शकत आहोत.


पूर्वी बारामती नगरपरिषद क्षेत्रफळ मानाने कमी असे परंतु गेल्या दहा बारा वर्षाच्या कालखंडात बारामती नगर परिषदेमध्ये जळोची ,तांदुळवाडी , रुई या विकसीत ग्रामपंचायतीचे विलीनीकरण बारामती नगर परिषदेमध्ये झाल्याने बारामती नगरपरिषदेचा झपाट्याने झालेला विकास यामागे या वर्धापन दिनानिमित्त सर्व काही सांगून जातो. बारामतीच्या त्या भागात झालेला झपाट्याने झालेला कायापालट त्याचे श्रेय त्या =त्या उर्वरित तत्कालिन ग्रामपंचायतीला व तेथील स्थानिक राजकारण्यांना व तेथील पदाधिकाऱ्यांनाही श्रेय जात आहे हे विसरता येणार नाही..!
काही असो परंतु बारामतीत जो काही विकासात्मक झपाटा व दूरदृष्टीचा अभ्यास व पर्यावरणाचे संतुलन आरोग्यदायी बारामतीची विकासात्मक विकासाची सुरू असलेली घोडदौड याकरिता अहोरात्र मेहनत , कष्ट परिश्रम घेऊन झटणारे तो प्रत्येक प्रशासनातील अधिकारी बारामती नगर परिषदेच्यातील पदाधिकारी अधिकारी कर्मचारी बारामती नगर परिषदेचे कर्मचारी वर्ग मुख्याधिकारी त्याचप्रमाणे प्रत्येक बारामतीकरांचा जिव्हाळ्याच्या विषयाला हात घालणारे बारामती नगरपरिषद व आपल्या बारामती नगर परिषदेच्या वर्धापन दिनास व अधिकारी कर्मचारी वृंदास यावेळी शुभेच्छा देण्याकरिता व सन्मान स्वीकारण्याकरिता व विविध मान्यवरांचे स्पर्धांचे , विजेत्याचे पत्रकार,सामाजिक कार्यात सहभागी होत त्यांचे सत्कार यावेळी पार पडले. बारामतीचे आजी-माजी राजकीय पदाधिकारी माजी नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व विविध राजकीय क्रीडा सामाजिक व्यापारी संस्थांचे तसेच बारामतीतील जनसमूह उपस्थितीत हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला सर्वांना भावनगरी च्या वतीने खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा व बारामती नगरपरिषदेला वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक 159 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here