बारामती नगरपरिषद निवडणूक अपडेट — निवडणूक प्रक्रियेला गती, २० डिसेंबरला मतदान..!

0
24

बारामती :

बारामती नगरपरिषद निवडणूक अपडेट — निवडणूक प्रक्रियेला गती, २० डिसेंबरला मतदान

बारामती :
बारामती नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकली असून येत्या २० डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदासह सर्व ४१ नगरसेवक पदांसाठी मतदान होणार आहे.

नगराध्यक्षपदासाठी नव्या उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार नाही, तर पूर्वी ज्या आठ प्रभागांमध्ये (८ ब, ११ ब, १३ ब, १५ ब, १७ ब, २१ ब, २३ ब, २७ ब) अपुऱ्या अर्जांमुळे अडचण निर्माण झाली होती, त्या प्रभागांमध्ये प्रथम छाननी होणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारीसाठी नवीन मुदत दिली जाणार नाही, तसेच उर्वरित प्रभागांमध्ये कोणताही बदल होणार नाही.

या प्रभागांमध्ये आधीच चर्चेत असलेल्या नावांचा समावेश आहे — सचिन सातव, अमर धुमाळ, संजय संचेवी, सुनील सस्ने, बिरजू मांढरे, जितेंद्र गुजर, आल्ताफ सय्यद इत्यादी.

नगराध्यक्षपदासाठीच्या ६ प्रभागांतील उमेदवारांना देखील नवीन मुदत मिळणार नाही, तसेच उर्वरित सदस्यांनाही कोणतीही नवीन संधी दिली जाणार नाही.

दरम्यान, ८ नगरसेवक विनाविरोध निवडून आले असून त्यांच्या निकालात कोणताही बदल होणार नाही. हे सर्व नगरसेवक पदावर कायम राहतील आणि त्यांच्या प्रभागातील मतदान फक्त नगराध्यक्षपदासाठी घेतले जाणार आहे.

नगराध्यक्षांसह उर्वरित ६ जागांसाठी नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून तो पुढीलप्रमाणे —

नवीन निवडणूक कार्यक्रम :

निवडणूक कार्यक्रम जाहीर — ४ डिसेंबर

उमेदवारी अर्ज माघारीची शेवटची मुदत — १० डिसेंबर

अंतिम यादी प्रसिद्ध — ११ डिसेंबर

मतदान — २० डिसेंबर

मतमोजणी — २१डिसेंबर

बारामतीमध्ये आता निवडणुकीची हवा चांगलीच जोर पकडत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here