ही योजना बारामती नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाद्वारे राबविण्यात येत आहे. “ई-पिंक रिक्षा योजना” महिला व युवतींना आत्मनिर्भर, स्वावलंबी, आणि सशक्त बनवण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:
1. ७०% कर्ज बँकेद्वारे उपलब्ध.
2. २०% आर्थिक भार राज्य सरकार उचलणार.
3. १०% आर्थिक सहभाग लाभार्थी महिलांकडून अपेक्षित.
पात्रता:
बारामती शहरी रहिवासी असणे आवश्यक.
वय २० ते ४० वर्षे.
वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
महिला बालकल्याण विभाग, बारामती नगरपरिषद.
श्रीमती कविता खरात (संपर्क क्रमांक: ७०७६०९०७०९).
हा उपक्रम महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वाची पायरी आहे.
ही योजना महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांसाठी असून अर्जदाराचे वय 20 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपेक्षा कमी असावे. अर्जासोबत आधार, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वयाचा पुरावा, पासपोर्ट फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. योजना महिलांना प्राधान्य देईल. शासकीय सबसिडी अंतर्गत बँक कर्जाद्वारे इ-रिक्षा खरेदी करता येईल.