बारामती तालुक्याला पावसाचा तडाखा — तहसीलदार श्री. गणेश शिंदे यांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन….!

0
78

बारामती तालुक्याला पावसाचा तडाखा — तहसीलदार श्री. गणेश शिंदे यांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन!

बारामती तालुक्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक भागात नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीचे तहसीलदार श्री. गणेश शिंदे यांनी नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे.

“नदी पात्र, कॅनॉल परिसरात जाणे टाळा!”
श्री. शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अतिवृष्टीमुळे नदी व कॅनॉल परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणीही अशा ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक काम असल्यासच घराबाहेर पडा, अन्यथा घरातच सुरक्षित राहा.

“अफवांपासून सावध राहा, प्रशासनावर विश्वास ठेवा!”
गोंधळ उडवणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत श्री. शिंदे म्हणाले, “आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आणि कुठल्याही शंका असल्यास खालील क्रमांकावर थेट संपर्क साधावा.”

संपर्क क्रमांक:
99224 47812
93598 07492

— गणेश शिंदे, तहसीलदार, बारामती
बारामतीकरांनो, हा काळ संयमाचा आहे. प्रशासनाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करूया, आणि आपले गाव, आपला तालुका सुरक्षित ठेवूया!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here