
बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने श्री संतश्रेष्ठ सेना महाराज पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन…
बारामती :
सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक असलेल्या संतश्रेष्ठ सेना महाराज पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन बारामती तालुका नाभिक संघटना, बारामती यांच्या वतीने बुधवार दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे ठिकाण भाई कोतवाल सोसायटी, भिगवण रोड, बारामती, जि. पुणे असेल.
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ ते ९ वा. – श्री सत्यनारायण महापूजा
सकाळी ९ ते १० वा. – पालखी मिरवणूक
सकाळी १० ते १२ वा. – किर्तन सेवा : ह.भ.प. राजाराम उदमले महाराज (बाभुळगाव खालसा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांचे किर्तन तसेच पंचक्रोशीतील श्री भैरवनाथ भजनी मंडळ, उंडवडी क.प. यांसह इतर भजनी मंडळींचा सहभाग
ह.भ.प. भागवत कांबळे महाराज, देवाची आळंदी यांचे पखवाज वादन
दुपारी १२ वा. – फुले अर्पण कार्यक्रम
दुपारी १२ ते १ वा. – उच्च पदावर कार्यरत अधिकारी समाजबांधवांचा सत्कार समारंभ
दुपारी १ ते ४ वा. – सर्व नाभिक बांधवांसाठी महाप्रसाद
यानिमित्ताने समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे
संतांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडेल .तरी सर्व नाभिक समाज बांधवांनी आपले दुकाने बंद ठेवून श्री संत श्रेष्ठ सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सोहळ्यासाठी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.