बारामती तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी रोहन शिंदे, तर उपाध्यक्षपदी अजित यादव यांची बिनविरोध निवड

0
11

बारामती तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी रोहन शिंदे, तर उपाध्यक्षपदी अजित यादव यांची बिनविरोध निवड

बारामती | २९ जुलै २०२५
बारामती तालुका नाभिक संघटनेच्या कार्यकारिणीची निवड दिनांक २९ जुलै रोजी अत्यंत उत्साही, सलोख्याच्या व पारदर्शक वातावरणात पार पडली. या निवडप्रक्रियेत रोहन शहाजी शिंदे यांची अध्यक्षपदी, तर अजित सुभाष यादव यांची उपाध्यक्षपदी एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारिणी खालीलप्रमाणे निवडून आली:
अध्यक्ष – रोहन शहाजी शिंदे
उपाध्यक्ष – अजित सुभाष यादव
कार्याध्यक्ष – अनंत आपुणे
खजिनदार – शिरीष काशीद
सचिव – आदेश संजय आपुणे
सहसचिव – ओंकार शिंदे
सदस्य म्हणून नियुक्त:
अमोल सूर्यवंशी, अभय सूर्यवंशी, नवनाथ सूर्यवंशी, शुभम माने, आकाश आपुणे, शंभू शिंदे, रोनक शिंदे, सुरज वारुळे, मारुती दुधाळ, संतोष काशीद, संतोष पवार, सागर माने

प्रसिद्धी प्रमुख: संतोष शिंदे (भावनगरी संपादक)

कायदेशीर सल्लागार: ॲड. प्रकाश बबनराव जाधव

कार्यक्रमाची सुरुवात श्री संतश्रेष्ठ सेना महाराज व शूरवीर जिवाजी महाले तसेच नरवीर शिवाजी काशीद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. या वेळी संघटनेच्या आगामी योजना, समाजातील ज्वलंत प्रश्नांवर खुले चर्चासत्र घेण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन खजिनदार शिरीष काशीद यांनी केले.

या वेळी मावळत्या कार्यकारिणीचा यथोचित सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्षांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “संघटनेच्या भविष्यासाठी आम्ही नव्या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.”

नवीन कार्यकारिणीकडून सक्रिय, पारदर्शक व विधायक कार्य होईल, असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष रोहन शिंदे यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, महेंद्र यादव यांनी सांगितले जुन्या आठवणींना उजाळा दिला ते म्हणाले की नूतन अध्यक्ष रोहन शिंदे हे माजी अध्यक्ष कै. शहाजी शिंदे यांचे सुपुत्र असून, कै. शिंदे यांनी समाजासाठी अडीच गुंठे जागा विकत घेऊन त्यावर एक कोटी रुपयांचे वस्तीगृह उभे केले. आज त्या वास्तूमध्येच त्यांच्या मुलाची अध्यक्षपदी निवड होणे हे समाजासाठी अभिमानाचे व भावनिक क्षण होते.

सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी सुधाकर माने होते. या सभेत संतश्रेष्ठ सेनामहाराज पुण्यतिथी साजरी करण्यासंदर्भातील नियोजनही करण्यात आले.

कार्यक्रमात समाजातील सर्व नाभिक व्यावसायिक, पदाधिकारी, माजी कार्यकारिणी सदस्य व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
नवीन कार्यकारिणीला संपूर्ण समाजबांधवांनी शुभेच्छा देत भविष्यातील वाटचालीसाठी विश्वास व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here