बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदी विनायक महादेव गावडे तर उपसभापतीपदी अरूण सकट
बारामती: बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ रोजी बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदी विनायक महादेव गावडे रा.गुणवडी आणि उपसभापती पदी अरूण गणपत सकट रा. कुतवळवाडी (सुपे) यांची बिनविरोध निवड झाली. बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी राजीनामा दिल्याने सदर निवड करण्यात आली. बारामती बाजार समिती ही शेतकरी व इतर श्रमजिवी बाजार घटकांसाठी काम करणारी संस्था असुन बाजार समितीचा नावलौकीक व आवारात विविध सुविधा पुरविणेचा समितीचा मानस असल्याचे नुतन सभापती व उपसभापती यांनी मत व्यक्त केले. समितीचे कामकाज उपमुख्यमंत्री अजिततदादा पवारसो यांचे मार्गदशनाखाली चालु असुन मुख्य व उपबाजार आवारात शेतकरी वर्गासाठी तसेच व्यापारी घटकांसाठी चांगले उपक्रम व सोय- सुविधा राबविल्या जातील अशी ग्वाही सभापती श्री. विनायक गावडे यांनी दिली.


सदर सभेचे कामकाज अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे साहेब यांनी पाहिले. नुतन सभापती व उपसभापती यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांचे आभार मानले. उपस्थितांनी नवनिर्वाचित सभापती विनायक व उपसभापती अरूण सकट यांचे अभिनंदन व सत्कार करणेत आला. यावेळी बाजार समितीचे संचालक उपस्थित होते. सदर निवडीचे वेळी माजी सभापती शिवाजीराव टेंगले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे व व्यापारी वर्ग तसेच इतर हमाल मापाडी प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी मानले.





