




बारामतीत ‘हॅपी स्ट्रीटस’चा रंगतदार जल्लोष!
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने दोन दिवसांचा आनंदोत्सव
बारामती, ता. 20 – बारामतीकरांसाठी खास आनंदाची मेजवानी घेऊन येतोय एक आगळा-वेगळा उपक्रम — ‘हॅपी स्ट्रीटस बारामती’! एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने 26 व 27 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात बारामतीकरांना मोकळ्या हवेत, मोबाईलपासून दूर राहत खेळ, संगीत, कला आणि पर्यावरणाचा भरपूर आनंद लुटता येणार आहे.
राज्यसभा खासदार सौ. सुनेत्रा ताई पवार यांच्या प्रेरणेतून साकारत असलेला हा उपक्रम शनिवार (ता. 26) रोजी संध्याकाळी 4 ते रात्री 10 आणि रविवार (ता. 27) रोजी सकाळी 6 ते 10 या वेळेत विद्या कॉर्नर ते गदिमा कॉर्नर या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार पडणार आहे. सर्व उपक्रम विनामूल्य असून, संपूर्ण कुटुंबासाठी हा एक परिपूर्ण उत्सव ठरणार आहे.
विविध झोन… विविध रंग!
‘हॅपी स्ट्रीटस’ अंतर्गत अनेक उत्साही झोन तयार करण्यात आले आहेत, जसे —
आर्ट झोन – मेंदी, टॅटू, फेस पेंटिंग, कॅलिग्राफी, वारली पेंटिंग, कॅरिकेचर, पोर्ट्रेट आणि बरेच काही!
सफारी झोन – नक्षत्र उद्यान परिसरात घोडेस्वारी, उंट सफारी आणि बैलगाडी फेरफटका! ग्रामीण सृष्टीचा अनुभव एकाच जागी.
हेल्थ अँड फिटनेस झोन – योगा, मल्लखांब आणि मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांची विशेष मेजवानी.
गेम्स झोन – पारंपरिक आणि आधुनिक खेळांचा संगम! सापशिडी, लगोरी, लुडो, गोट्या, कॅरम, बुध्दीबळ, बलून शूटिंग, बास्केटबॉल, आर्चरी इत्यादी.
पर्यावरण झोन – बारामती नगरपरिषदेच्या सहकार्याने प्लॅस्टिक निर्मूलन, ई-कचरा व्यवस्थापन आणि होम कंपोस्टिंग यासंदर्भात माहितीपर उपक्रम.



म्युझिक झोन – गिटार, अँकार्डियन, माउथ ऑर्गनवर सादर होणारी लोकप्रिय गीते, थेट कलाकारांच्या हातून!
खास आकर्षण:
महिला बचत गटांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स – स्थानिक चवांचा स्वाद चाखण्याची संधी!
मुलांसाठी विशेष कार्यक्रम – कार्टून पात्रे, जादूगार, खेळांची धमाल – लहानग्यांसाठी भरपूर मजा!
आवाहन
बारामतीकरांनी या रंगतदार आणि कौटुंबिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि ‘हॅपी स्ट्रीटस बारामती’ चा जल्लोष अनुभवावा, असे आवाहन खासदार सुनेत्रा पवार यांनी केले आहे.
रविवार-शनिवार ठरवा, आनंदात रमून जा – ‘हॅपी स्ट्रीटस बारामती’ला अवश्य या!