बारामतीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी..
बारामती प्रतिनिधी: साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त काल दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस हार व पुष्गुच्छ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वाहण्यात आले.
महापुरुष यांच्या विचार कार्यासाठी मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहिले असता अनेकांनी आपले विचार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रति व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन बिरजू भैया मांढरे मित्र मंडळ यांच्या वतीने व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते
यावेळी प्रस्ताविकातून बिरजू भैया मांढरे यांनी म्हटले की, अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवसाची शाळा शिकलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कष्टकरी समाजाचे चित्र त्यांनी आपल्या सोसलेल्या वेदनेमुळे लेखणीला मग धार दिली.
परंतु त्यांचे विचार साहित्य मोठमोठ्या विचारधारे, विध्वंसकच्या लोकांना पाझर फोडणारे होते.
म्हणून त्यावेळेसचा परिस्थितीला हाणून पाडणारे साहित्य त्यांचे लेखन कायम आजही आजरामर अन्यायाला वाचा फोडणारे समाज प्रबोधनासाठी त्यांचे कार्य अभूतपूर्व समाज सुधारक आहे .
याचाच विचार सरकार पक्षाने करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीच्या व साहित्याच्या चळवळीची दखल घेत भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे.
अशी अपेक्षा आपल्या प्रास्ताविकातून
मा. उपनगराध्यक्ष बिरजू भैया मांढरे यांनी व्यक्त केले .
यावेळी बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे ,sdo . हनुमंतराव पाटील ,ज्येष्ठ विद्यमान नगरसेवक किरणदादा गुजर, बारामती राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जयदादा पाटील, नगराध्यक्ष पौर्णिमाताई तावरे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, विद्यमान नगरसेवक सुधीर पानसरे, अतुल बालगुडे, अनिताताई जगताप, तसेच अल्ताफ सय्यद, भारतदादा अहिवळे, धनंजय तेलंगे, सुनील शिंदे ,साधू बल्लाळ पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय भिसे तसेच विविध संपादक व पत्रकार यांच्या उपस्थितीत. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी उत्साहांमध्ये साजरी करण्यात आली.
प्रमुख आयोजक बिरजू भैय्या मांढरे मा. उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बारामती नगरपरिषद.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्तीत होते
या वेळी विविध क्षेत्रातील गुणवंत व विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला
या प्रसंगी सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले, तर आभार सुनील शिंदे यांनी व्यक्त केले.