बारामतीत श्रीरामनगर येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्सहात साजरा..

0
186

बारामती : प्रतिनिधी

श्रीराम नगर, भिगवण रोड येथील के. भगवानराव तावरे यांनी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्सहात साजरा करण्यात आला.

गुढी पाडव्याच्या शुभ मुहर्तावर सुरू झालेल्या या उत्सवा अंतर्गत संगीत तुली रामायण, भजन, किर्तन, हरीपाठ, जागर, भारूड, काकडा, महापूजा, होम हवन, श्रीराम नाम सप्ताह, श्रीराम जन्मोत्सव सोहळा तसेच जन्मोसवाच्या दिवशी पालखीचे आयोजन या वेळी शेकडो भाविक भक्त सामील झाले होते. श्रीराम नवमी दिवशी श्रीराम जन्माचे किर्तन ह भ प कृष्ण महाराज मेहुणकर यांचे झाले तसेच काल्याचे किर्तन हे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे १० वे वंशज ह भ प बापूसाहेब मोरे (दहुकर) यांचे सुंदर किर्तन झाले. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. अशी माहिती अडॅ. हरीप भगवानराव तावरे यांनी दिली. मंदिरात दर्शनासाठी मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलिस निरीक्षक सुनिल महाडीक तसेच शहर आणि पंचक्रोशितील रामभक्त मोठ्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here