बारामतीत शेजारील वादातून मारहाण; युवकावर गुन्हा दाखल
बारामती : गुणवडी विद्यानगर परिसरात 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास शेजारील वादातून झालेल्या मारहाणीची तक्रार बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
फिर्यादी किरण राजाराम घाडगे (वय 36, व्यवसाय मजुरी, रा. गुणवडी विद्यानगर, बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे शेजारी राहुल किसन पोमणे यांनी जागेकडे पाहिल्याच्या कारणावरून राग धरून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या डाव्या हाताचे मधले बोट फ्रॅक्चर झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राहुल पोमणे याच्याविरुद्ध भादंवि कलम 115(2), 117(1), 117(2), 352, 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नलवडे करत आहेत.
मारहाणीच्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.