बारामतीत आज महावीर जन्मकल्याणकानिमित्त विविध कार्यक्रम
आज रविवारी २१ रोजी बारामतीत महावीर जन्मकल्याणकानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन केले गेले. जैन बांधव मोठ्य संख्येने उपस्थित होते.
बारामती, ता. 21- दरवर्षी प्रमाणे यंदाही सकल जैन समाजाच्या वतीने आज (ता. 21) बारामतीत महावीर जन्मकल्याणका निमित्त सकाळी महावीर पथवरील श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदीरापासून भव्य शोभायात्रेचे आयोजन केले गेले. या मध्ये जैन युवकांच्या ढोल पथकाने पारंपरिक पध्दतीने ढोलवादन केले.
या शोभायात्रेमध्ये दिगंबर, श्र्वेतांबर व स्थानकवासी जैन समुदायाचे बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प.पू. प्रवचनकार मुनिवर्य श्री. सत्यकांत विजयजी महाराज साहेब हेही आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. महावीर पथ, मारवाड पेठ, बुरुडगल्ली मार्गे भिगवण चौक, इंदापूर चौक व गुनवडी चौकातून ही शोभायात्रा गेली.
भिगवण चौकामध्ये खासदार सुप्रिया सुळे, जय अजित पवार यांच्यासह जवाहर वाघोलीकर, सदाशिव सातव, जय पाटील, अँड. संदीप गुजर, सत्यव्रत काळे, वनिता बनकर, सचिन सातव यांच्यासह अनेक मान्यवर शोभायात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
दिगंबर जैन समाजाच्या वतीने किशोर शहा (सराफ), पदमकुमार मेथा, गौरव कोठडीया, संजय संघवी, धवल वाघोलीकर, अतुल गांधी, विशाल वडूजकर
श्वेतांबर जैन समाजाच्या वतीने दिलीप दोशी, पी.टी. गांधी, प्रवीण सुंदेचा मुथा, जयेंद्र मोदी, मेहुल दोशी, केवल मोता, जिगर ओसवाल तसेच स्थानकवासी जैन समाजाच्या वतीने दिलीप धोका, ललित टाटीया, किशोर कोठारी, जवाहर कटारिया यांच्यासह तिन्ही समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री महावीर भवन येथे श्री बारामती दिगंबर जैन सैतवाळ परिवाराच्या वतीने जैन बांधवांसाठी प्रसादभोजनाचे आयोजन केले गेले. आभाळमाया ग्रुपच्या वतीने अल्पा नितीन भंडारी व त्यांच्या सहका-यांच्या वतीने वन्यक्षेत्रातील प्राण्यांची तहान भागविण्यासाठी दोन टँकर रवाना करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे व मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.