बारामतीत भिमाई वधू-वर सूचक मंडळातर्फे भव्य बौद्ध वधू-वर परिचय मेळावा

0
73

बारामतीत भिमाई वधू-वर सूचक मंडळातर्फे भव्य बौद्ध वधू-वर परिचय मेळावा

बारामती (प्रतिनिधी) – सोशियल फाउंडेशन बारामती संचालित “माता भिमाई वधू-वर सूचक मंडळा”तर्फे रविवार, दिनांक २५ मे २०२५ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत भव्य बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याचे ठिकाण सावित्रीबाई फुले मंगल कार्यालय, पानमळा, मच्छी मार्केट शेजारी, गुणवडी चौक, बारामती असे असून, बौद्ध समाजातील वधू-वरांना एकमेकांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबवले जात आहेत.

परिचयासाठी नोंदणी शुल्क ₹५०० असून, नोंदणीची अंतिम तारीख २५ मे २०२५ पर्यंत आहे. इच्छुकांनी QR कोडद्वारे किंवा ऑनलाईन लिंकवरून नोंदणी करावी. मेळाव्याच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी १ व २ ते ४ या वेळेत स्वतंत्रपणे भेट घेऊन एक मेकांशी संवाद साधून मंगल परिणय जुळण्यास मदत होवी या करिता बैठक आयोजित करण्यात येणार आहे
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व संयोजक:अध्यक्ष: आयु. डॉ. डी.व्ही.सरवदे–9527721475
सचिव: आयु. मोहन गायकवाड – 9422415137 संस्थेचे प्रमुख पदाधिकारी: आयु. सचिननाना साबळे – 9260000056, आयु. प्रकाश चव्हाण – 9881114836

तसेच नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांना चहा व भोजनाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here