प्रतिनीध : श्री महावीर भगवान जन्मकल्याणक निमित्त
भारतीय जैन संघटना व सुशीला एक्सीडेंट हॉस्पिटल डॉ. श्री.गोकुळजी काळे सर यांच्या संयुक्त विद्यमाने
हाडा संबंधी तक्रारी तसेच हाडांच्या ठिसूळपणाची मोफत तपासणी शिबिर सुशीला एक्सीडेंट हॉस्पिटल सिल्वर ज्युबली सरकारी हॉस्पिटलच्या समोर 14 एप्रिल 2024 रविवार सकाळी 9 ते 12 या वेळेत ठेवण्यात आले होते या कार्यक्रमाचे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला सदर शिबिरामध्ये 81 जणाची तपासणी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात सकल जैन समाज चे श्री श्र्वेतांबर मंदिर चे अध्यक्ष श्री दिलीपजी दोशी ,श्री वर्धमान स्थानकवासी संघ चे अध्यक्ष श्री दिलीपजी धोका व श्री दिगंबर मंदिर चे अध्यक्ष श्री किशोरजी शहा तीन ही संप्रदाय चे ट्रस्टी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात केली या शिबिरामध्ये जैन धर्मगुरू श्री. सत्यकांत विजयजी महाराज साहेब व श्री. आदित्य सोम विजयजी महाराज साहेब ह्यांनी शिबीर स्थळी उपस्थित राहून शुभ आशीर्वाद दिले. ह्या चेक अप कॅम्प मधे डॉ. श्री.गोकुळजी काळे सर व त्यांचे पूर्ण हॉस्पिटल टीम नी कॅम्प यशस्वी करण्यात खूप मदत केली .
तसेच ह्या शिबिर चे नियोजक व आयोजक श्री. निखिल रविंद्र मुथा ,भारतीय जैन संघटना पुणे जिल्हा ग्रामीण एक सदस्य व श्री. पंकज पोपटलाल गादिया, पुणे जिल्हा विभाग सदस्य व श्री विजय मंडलेचा ग्रामीण उपाध्यक्ष व इतर बारामती येथील जैन संघटना चे पदाधिकारी व कार्यकर्ते व सर्व समाज बांधव या सर्वांच्या उपस्थितीत पार पडला