बारामतीत बेकायदा गोवंश मांस व जनावरांवर पोलिसांची कारवाई: ६.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बारामती शहरातील माढा कॉलनी, देवळे इस्टेट येथे मोठ्या प्रमाणात बेकायदा गोवंश मांस आणि जिवंत जनावरे बाळगली जात असल्याची गुप्त माहिती मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड (बारामती विभाग) यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली.
कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल:
१२०० किलो गोवंश जातीचे मांस
२ जर्सी गाई व २ जर्सी वासरे
३ चारचाकी वाहने
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत – ६,४२,००० रुपये
सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणात सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- सलिम चाँद कुरेशी (रा. फलटण रोड, महालक्ष्मी शोरूम समोर)
- सुफीयान रफीक बागवान (रा. रविवार पेठ, शतरंजवाला चौक, सुभान अल्ला हॉटेल मागे, पुणे)
- गुलाब बनीलाल शेख (रा. जगतापमळा, बारामती)
- सफैन अमिन शेख (रा. आसु, ता. फलटण, जि. सातारा)
- गौस मुबारक कुरेशी (रा. फलटण रोड, बारामती)
- मैनु मुबारक कुरेशी (रा. फलटण रोड, बारामती)
- असिफ मुस्तफा कुरेशी (रा. म्हाडा कॉलनी, बारामती)
सखोल तपास सुरू
बारामती शहर पोलीस स्टेशनकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत आणखी काही इसमांची नावे समोर येण्याची शक्यता असल्याने पुढील तपास सुरू ठेवण्यात आला आहे.
पोलीस दलाची प्रभावी कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (पुणे ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती), उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड (बारामती विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बारामती शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तपणे ही मोठी कारवाई करत अवैध कत्तल व्यवसायावर आघात केला आहे.
- बारामती शहर प्रतिनिधी