बारामतीत पोपटपंचीचे राजकारण…!
संपादक :- संतोष शिंदे -भावनगरी बारामती ९८२२७३०१०८
बारामती लोकसभा मतदार संघात निवडणूक 2024 साठी ची पोपटपंची करून बारामतीत राजकारणाचा सूर काही गवसत नाही असे म्हटले तर वागावे ठरु नये..! शरद पवार, अजित पवार, सुप्रीया सुळे, तर संपूर्ण पवार कुटूंबियांच्यावर चर्चा ही सर्वच रंगतदार होत आहेत.
कार्यकर्ते मात्र संभ्रमीत आहेत. हे आमचेचं हो नेते तेही आमचेचं हो नेते अस्यांची चर्चा होते. त्यामुळे अजूनही प्रतिस्पर्धेचे राजकारण नसल्याचे चित्र स्पष्ट होताना दिसून येते.
मुलगा ऐकीकडे तर बाप एकीकडे जायचे कोणाकडे सच्चा कार्यकर्ता दिसून येत नाही. ठरावीक कार्यकर्ते तर दररोजचे काहीच चेहरे काही या गटात तर काही त्या गटात बाकी गर्दी नुसतीच असेही पहायला मिळत आहे.
सौ. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे उमेदवार निश्चीत समजली असल्यामुळे प्रचार बारामतीचा परिसर, तालुकातील विविध गावे, वाडे, वस्त्या, मार्केट, तर काही ठिकाणी आजवर मेळापेही पार पडले, तेही स्वताः अजित पवार व एकीकडे शरद पवार यांचेही राजकीय वलय असे स्पष्ट
दिसून येत नाही.
आजवर बारामती व तालुक्यातील जनतेने या बड्या नेत्यांना वेगवेगळे कधी पहायले नव्हते. ते परस्परांच्या विरोधांत गेल्यामुळे परीस्थिती व राजकारण राजकारणाचे समीकरण महाराष्ट्राप्रमाणे बारामतीत ही यावेळी बदलणार काय तसे चित्र दिसून येत आहे ….
इंदापूरातही खरी कसोटी म्हणावी लागल… पक्षधर्म तर राजकीय कुरघोडी होणार… पुरंदर मध्ये शिवसेना गटाचे परंतु अपक्ष उमेदवार म्हणून बंड करण्याच्या तयारीत
आहेत.
दौंड मध्ये … कुल … थोरात कुरघोडी असणार भाजपा कदाचित साथ देईन अजित पवार गटाला असे वाटत असले तरी प्रत्यक्षात पाहावं लागेल की तेथील पक्ष व महायुती भेदणार तर नाही ना युतीधर्म शेवटी पाळलां जाईल का..असा प्रश्न निर्माण होत आहे….!
मात्र भोरला मात्र निर्णय दयायला उशीर होतोय… संभ्रमीत मतदार बंधू भगिनी तेथील परिसरात दिसून येतात. थोपटे यांची राजकीय भूमीका महत्वांची वाटत आहे, थोपटेंनी जर पुरंदरच्या बंडाला पाठिंबा दिला तर काँग्रेसचे मतधिक्यें हे अपक्षाला मिळणार असे चिन्ह आहे . मतांचे तेथे विभाजन होणार …?! तर बरामतीचा सूर सापडत नसल्यामुळे राजकीय बारामतीच्या पंढरीत मात्र यासर्वचं राजकारणात पोपटपंचीचे वातावरण निर्मिती झाल्यामुळे चित्र स्पष्ट होणे तसे अवघड आहे….!