बारामतीत पॉवर मॅरेथॉनचा जल्लोषात शुभारंभ! मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते झेंडी दाखवून उत्साही प्रारंभ…
बारामती | आज सकाळी बारामती शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते बारामती पॉवर मॅरेथॉनला झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. मॅरेथॉनच्या प्रारंभी शेकडो धावपटूंनी “फिट बारामती – हेल्दी बारामती”चा नारा देत जोशपूर्ण वातावरण निर्माण केले.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील मुसळे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, सतीश ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री मकरंद पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की,बारामतीत सकारात्मकता विकासात्मक दृष्टिकोन ठेवूनच “बारामतीने नेहमीच खेळ आणि आरोग्य संस्कृतीचा वारसा जपला आहे. अशा मॅरेथॉनच्या माध्यमातून नव्या पिढीत फिटनेसची जागृती होत आहे, हे अत्यंत आनंददायी आहे.”

मॅरेथॉनमध्ये विविध राज्यातून जिल्ह्यातून शहरासह ग्रामीण भागातील युवक-युवती, शालेय विद्यार्थी, पोलिस दल, विविध संस्थांचे प्रतिनिधी, तसेच नागरिकांनी व मोठमोठ्या देशपातळीवरील धावपट्टूनी मोठ्या उत्साहाने ४२ कि.मी २१ कि.मी १० कि.मी ५ कि.मी धावण्याच्या स्पर्धात सहभाग घेतला. बारामतीकरांनी “धावून दाखवू या – निरोगी बनवू या” या भावनेने कार्यक्रमात सहभाग घेत मॅरेथॉनला भव्य स्वरूप दिले. एका ७ वर्षीय चिमुकलीचे ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला तिचा ही सत्कार कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस विभाग, आणि स्वयंसेवी संस्थांनी उत्कृष्ट समन्वय साधला. संपूर्ण बारामती शहरात आज सकाळपासूनच मॅरेथॉनमुळे उत्साहाचे वातावरण पसरले होते.




