
बारामतीत पत्रकार संघाचा पदग्रहण सोहळा; दिग्गज मान्यवरांची उपस्थिती…!
बारामती शहरात येत्या रविवारी (१० ऑगस्ट) पत्रकारिता क्षेत्रातील एक अनोखा जल्लोष पाहायला मिळणार आहे. भारतीय पत्रकार संघ – बारामती विभागातर्फे आयोजित पदग्रहण व सन्मान सोहळ्याला शहरातील दूध उत्पादक संघाच्या भव्य सभागृहात रंगणार आहे. या सोहळ्याची माहिती पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष तैनूर शेख यांनी दिली.
या सोहळ्याचे उद्घाटन राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन विराजमान होणार आहेत.
सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नुकतेच कृषिमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेले दत्तात्रेय भरणे, माजी राज्यमंत्री व पुरंदर-हवेलीचे विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे, तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.
सन्माननीय उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम. एस. शेख, प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ, संघटक अनिल सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष रमेश गणगे, महिला अध्यक्षा आरती बाबर, पुणे शहराध्यक्षा पूनम एकडे, जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे, लीगल विंग प्रदेशाध्यक्ष कैलास पठारे, ए. आय. जे. सातारा जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव, कार्याध्यक्ष रवींद्र बोंद्रे, सोलापूर कार्याध्यक्ष आर. एल. नदाफ, पुणे जिल्हा प्रवक्ते प्रा. दिनेश पवार, शिरूर तालुकाध्यक्ष राजू कांबळे, दौंड तालुकाध्यक्ष सुभाष कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा भव्य सोहळा भारतीय पत्रकार संघ – बारामती तालुका व शहर कार्यकारिणीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. आयोजन समितीचे बारामती तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे व शहराध्यक्ष उमेश दुबे यांनी पत्रकारांना माहिती देताना, “पत्रकारांच्या कार्याला सन्मान देणारा आणि संघटनेची ताकद वाढवणारा हा सोहळा ठरणार आहे,” असे सांगितले