बारामतीत “जीवन सुंदर आहे” या विषयावर गणेश शिंदे यांचे अंतर्मनाला भिडणारे व्याख्यान
बारामती –
“निसर्गाशी आपली नाळ जुळवली, तरच खऱ्या अर्थाने जीवन सुंदर बनते,” असा मनोवेधक संदेश सुप्रसिद्ध विचारवंत गणेश शिंदे यांनी शनिवारी (२६ एप्रिल) बारामतीकरांना दिला.
एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित ‘प्रतिबिंब’ व्याख्यानमालेच्या अंतर्गत, गदिमा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची भावपूर्ण सुरुवात
कार्यक्रमाची सुरूवात पुलगाम येथे वीरमरण आलेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून,
दीप प्रज्वलन
अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, व्याख्याते गणेश शिंदे आणि फोरमचे सदस्यांच्या उपस्थितीत झाले.
सुञसंचालन ज्ञानेश्वर (मामा) जगताप यांनी अत्यंत ओघवत्या व सहज संवादशैलीत करत, वातावरणात सकारात्मक ऊर्जा फुलवली. शेवटी उपस्थित मान्यवरांचे श्रोत्यांचे आभार व्यक्त केले.
“जीवन सुंदर आहे” — शिंदे यांचे गोडवेहून गोड विचार
गणेश शिंदे यांनी आपल्या भाषणात सहज उदाहरणे देत जीवनाचे मौल्यवान धडे दिले. त्यांनी सांगितले:
“कोविडसारख्या संकटात माणसाची असहाय्यता उघडी पडली. निसर्गाशी असलेली आपली नाळ तुटल्यानेच जीवनात अस्थिरता आली आहे.”
एका साध्या पक्ष्याच्या घरट्याचे उदाहरण देत त्यांनी निसर्गावरील अवलंबित्व आणि संवेदनशीलतेचे महत्त्व पटवून दिले. छोट्या-छोट्या गोष्टींतून त्यांनी जीवनाचे गूढ अत्यंत प्रभावीपणे उलगडले.
रसाळ किस्से आणि गोड गोड उदाहरणांची बरसात
एखाद्या पक्ष्याचे घरटे उध्वस्त झाले तर त्याचे दुःख, आणि त्यावरून माणसाच्या बांधलेल्या अपेक्षांचा परिणाम त्यांनी हृदयस्पर्शी उदाहरणाने समजावले.
जंगलातील रम्य प्रसंग, रस्त्यावरून जाणारा ट्रक, आपल्यावर होणाऱ्या तात्पुरत्या गोष्टींचे भान — असे अनेक प्रसंग त्यांच्या शैलीत सहज गुंफले गेले.
राम-कृष्णाचा आदर्श देत त्यांनी जीवनातील मोह, अहंकार आणि आत्मज्ञान यांचा सहज सांगोपांग अभ्यास श्रोत्यांपुढे मांडला.
त्यांच्या प्रत्येक उदाहरणात, जीवनाकडे बघण्याची एक नवी दृष्टी उलगडत होती.
त्यांच्या भावस्पर्शी गोष्टींनी सभागृहात नकळत अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले, तर टाळ्यांचा प्रचंड गजर झाला!
आत्मज्ञान आणि निसर्गाशी नाळ जोडण्याचा संदेश
“खरे ज्ञान म्हणजे निसर्गाशी सुसंवाद साधणे,” हा शिंदे यांचा ठाम संदेश प्रत्येकाच्या अंतःकरणात ठसला.
ते म्हणाले,
“आपले दुःख व सुखही क्षणभंगुर आहे. आपला अहंकारच आपल्या व्यथा वाढवतो.”
त्यांनी बहिणाबाई चौधरी, आज्जीच्या नातवाचं प्रेम, नवीन साड्या, मुलींच्या स्टेटसवरचा अतिरेक, सीतेचा मोह, राम कोणाला आवडतो कृष्ण कोणाला आवडतो सर्वांना कृष्णा आवडतो कारण रामाचा वनवास कोणालाही नकोय कृष्णाचा लीला — या सर्व उदाहरणांमधून सुंदर आयुष्याची मूल्ये उलगडून दाखवली.

बारामतीकरांचा उदंड प्रतिसाद एन्व्हायरमेंटल फोरम अध्यक्ष
सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने आयोजित हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला होता.
गदिमा सभागृह पूर्ण क्षमतेने भरून गेले होते, आणि उपस्थितांनी हृदयभरून व्याख्यानाचा आनंद घेतला.
गणेश शिंदे यांचे हे व्याख्यान ‘प्रतिबिंब’ मालिकेतील एक तेजस्वी आणि अविस्मरणीय क्षण ठरले.
जीवन सुंदर आहे, हे केवळ बोलायचं नाही, तर अनुभवायचं असतं — हे त्यांनी प्रत्येकाच्या मनावर ठसवलं!
शेवटी वंदे मातरम .. भारत माता की जय या गीताने सांगता झाली..

