बारामतीत “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव” रथयात्रेचे उद्या भव्य स्वागत!
बारामती (प्रतिनिधी) —
महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५” रथयात्रेचे उद्या, मंगळवार दि. २९ एप्रिल २०२५ रोजी बारामती तालुक्यात भव्य स्वागत होणार आहे. या अनुषंगाने सकाळी १०.०० वाजता राष्ट्रवादी भवन, कसबा, बारामती येथे कलश पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी बारामती तालुक्यातील सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि नागरिक यांना विशेष आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या उपस्थितीने या ऐतिहासिक क्षणाची शोभा वाढवावी.
या रथयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यप्रवणतेचा जयघोष होणार असून, प्रत्येक गावात व प्रत्येक माणसाच्या मनात अभिमानाची ज्वाळा पेटवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे संयोजन आणि नेतृत्व बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. श्री. राजवर्धनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
त्यांनी सर्वांना आवाहन केले आहे की, “ही रथयात्रा केवळ एक कार्यक्रम नसून, महाराष्ट्राच्या तेजस्वी स्वाभिमानाचे प्रतीक आहे. चला, एकत्र येऊया आणि आपला अभिमान द्विगुणित करूया!“
